हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून शेतक-याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:46 IST2017-11-14T02:46:17+5:302017-11-14T02:46:38+5:30
हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून अशोक राऊत (५५, रा. रामगाव) या शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी जळगाव आर्वी शिवारात उघडकीस आली.

हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून शेतक-याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे (अमरावती) : हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून अशोक राऊत (५५, रा. रामगाव) या शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी जळगाव आर्वी शिवारात उघडकीस आली.
राऊत यांचे पाच एकर शेत आहे. सोमवारी सकाळी ते हरभरा पिकाला सिंचन करण्यासाठी शेतात गेले होते. या वेळी स्टार्टरला हात लावताच त्यांना विजेचा धक्का लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.