शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या पाण्याच्या टाकीचे काय होणार?

By admin | Updated: October 26, 2015 02:12 IST

सोलापूर शहरातील पाण्याची टाकी ज्या जमिनीवर (सर्व्हे क्र. ३०५/३ए) गेली सुमारे ३० वर्षे उभी आहे, ती जमीन महापालिकेने येत्या दोन वर्षांत जमीन मालकाकडून रीतसर मोबदला देऊन संपादित करावी.

मुंबई : सोलापूर शहरातील पाण्याची टाकी ज्या जमिनीवर (सर्व्हे क्र. ३०५/३ए) गेली सुमारे ३० वर्षे उभी आहे, ती जमीन महापालिकेने येत्या दोन वर्षांत जमीन मालकाकडून रीतसर मोबदला देऊन संपादित करावी. अन्यथा टाकी पाडून टाकून जमीन मूळ मालकास होती तशी परत करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.पाण्याची टाकी बांधलेली ही ८९६ चौ. मीटर जमीन सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन कायद्यानुसार रीतसर संपादित न करता ‘बॉम्बे रेक्विझिशन अ‍ॅक्ट’नुसार २८ मे १९८६ रोजी केवळ अधिग्रहित केली होती. ही जमीन मरहूम डॉ. मोहम्मद अली नवाबसाहेब वाडवान यांच्या मालकीची होती. त्यानंतर २९ वर्षे चार महिने लोटले तरी जमीन रीतसर संपादित करून आपल्याला मोबदलाही दिला जात नाही किंवा जमीनही परत केली जात नाही म्हणून डॉ. मोहम्मद अली यांच्या वारसांनी रिट याचिका केली होती.न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर करताना असा निकाल दिला की, पाण्याची टाकी पाडून टाकून शहराची गैरसोय व्हावी, असे वाडवान कुटुंबीयांचेही म्हणणे नाही. आपली जमीन रीतसर संपादित करून त्याचा कायद्यानुसार योग्य मोबदला मिळावा, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोलापूर महापालिका व राज्य सरकार यांनी टाकी बांधण्यासाठी वापरलेली ही जमीन रीतसर संपादित करून त्याचा मोबदला देण्याची कारवाई येत्या २ वर्षांत पूर्ण करावी. मात्र २ दोन वर्षांनंतरही जमीन संपादनाची कारवाई पूर्ण केली गेली नाही, तर महापालिकेस पाण्याची टाकी पाडून जमीन आधी होती त्या स्थितीत मूळ मालकास परत करावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.न्यायालयाने म्हटले की, ‘रेक्विझिशन अ‍ॅक्ट’नुसार अधिग्रहित केलेली जमीन सरकार कायमस्वरूपी स्वत:कडे ठेवू शकत नाही. यासाठी कायद्याने जास्तीतजास्त १९ वर्षांची मुदत घालून दिली आहे. वाडवान यांच्या जमिनीच्या बाबतीत ही मुदत २००५मध्येच संपली व खरेतर सरकारने तेव्हाच त्यांना जमीन परत द्यायला हवी होती. पण तसे न करता सरकारने जमीन संपादित करण्याची कारवाई सुरू केली. पण नंतरच्या ८ वर्षांतही हे संपादन पूर्ण केले गेले नाही. परिणामी, वाडवान यांची जमीन सरकारने २९ वर्षे ४ महिने स्वत:कडे ठेवली. वाडवान यांची जमीन अधिग्रहित करण्याची मूळ कारवाईच दूषित झाल्याने न्यायालयाने ती रद्द केली. मात्र जमिनीवर पाण्याची टाकी आहे, हे लक्षात घेऊन न्यायालयाने जमीन पालिकेला २ वर्षांची मुदत दिली.