अफजल खानची कबर बंद करण्याचा अधिकार काय?

By Admin | Updated: July 23, 2014 00:04 IST2014-07-23T00:04:50+5:302014-07-23T00:04:50+5:30

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानची कबर सरकारने कोणत्या अधिकाराखाली बंद केली आहे याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिल़े

What is the right to shut the grave of Afzal Khan? | अफजल खानची कबर बंद करण्याचा अधिकार काय?

अफजल खानची कबर बंद करण्याचा अधिकार काय?

मुंबई : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानची कबर सरकारने कोणत्या अधिकाराखाली बंद केली आहे याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने  मंगळवारी राज्य शासनाला दिल़े
न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली़ 2क्क्7 मध्ये सातारा पोलीस अधीक्षकांनी ही कबर सर्वासाठी खुली ठेवल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अहवाल शासनाला दिला़ त्याची दखल घेत  कबर बंद करण्यात आल्याची माहिती  सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला दिली़ त्यावर न्यायालयाने हा आदेश दिला.  याप्रकरणी नेरूळ येथील फरीद डावरे यांनी याचिका केली आह़े काही संघटनांनी ही कबर तोडण्याची धमकी  दिल्याने सरकारने तेथे जाण्यास पर्यटकांना बंदी केली़ ही कबर खुली करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

 

Web Title: What is the right to shut the grave of Afzal Khan?