शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘घेऊन जा गे मारबत’, नागपूरची ‘मारबत’ व ‘बडगे’ परंपरा नेमकी काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 16:38 IST

समाजातील अनिष्ठ प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने नागपुरात ‘तान्हा पोळ्या’ला ऐतिहासिक ‘काळी’ व ‘पिवळी’ मारबत काढण्यात येते. पिवळ्या मारबतीसोबत काळ्या मारबतीचीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

-बालाजी देवर्जनकर, नागपूरसमाजातील अनिष्ठ प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने नागपुरात ‘तान्हा पोळ्या’ला ऐतिहासिक ‘काळी’ व ‘पिवळी’ मारबत काढण्यात येते. पिवळ्या मारबतीसोबत काळ्या मारबतीचीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमिटीतर्फे इतवारीतून १८८१ पासून ‘काळी मारबत’ची मिरवणूक काढली जाते. जुलमी इंग्रजांच्या कारवायांचा निषेध करण्यासाठी ‘काळी मारबत’ निघण्याची परंपरा सुरू झाली. तर परकीयांच्या गुलामगिरीचे पाश तुटावेत व देश स्वतंत्र व्हावा या देशभक्ती भावनेने प्रेरित होऊन १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तेली समाजबांधवांनी ‘पिवळी मारबत’ कमिटीची स्थापना केली. तेव्हापासून पिवळी मारबत निघते.नागपूरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी गौरवाची परंपरा असलेली मारबत आणि बडग्यांची मिरवणूक यंदा सोमवारी, दि. १० सप्टेंबरला निघेल. पारंपरिक काळी व पिवळी मारबत वाढती रोगराई व समाजात बोकाळलेल्या कुप्रथांना ‘आपल्यासोबत घेऊन जा’, असे सांगणारे ‘बडगे’ या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असतात. पोळ््याच्या सणाने श्रावण महिना संपत असतानाही या मिरवणुकीत नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. ‘घेऊन जा गे मारबत’, अशी घोषणा देत कुप्रथा, कुनिती, भ्रष्टाचाराचा नाश होवो, रोगराई दूर सरो, असे साकडे मारबतीला घातले जाते. ही गौरवशाली परंपरा उपराजधानीने अगदी उत्साहाने जोपासली आहे.बैठक मांडून बसलेली २० फुट उंचीची, संपूर्ण पिवळ्या रंगाची, आकर्षक दागिन्यांची मढलेली ही मारबत बघायला विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातून लोक येतात. इतवारी धान्य बाजारातून निघणारी काळी मारबतची परंपराही अशीच गौरवशाली. लाल रंगाची लांबलचक जीभ बाहेर काढलेली, प्रचंड वटारलेले डोळे अशा क्रोधित देवीच्या रुपात असलेली ही मारबत या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असते. खरे तर पुढील काळात या मारबतीच्या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यास सुरुवात झाली. या मिरवणुकीत निघणाऱ्या बडग्यांच्या माध्यमातून आता राजकीय व्यंग, भ्रष्टाचार, देशपातळीवरील गुन्हेगारी, सामाजिक गमतीजमती हे विषय विशेष आकर्षण असतात. विषयांची मांडणी योग्यतऱ्हेने व्हावी यासाठी महिनाभरापासून ही मंडळे जीवाचे रान करतात. मारबत ही जवळपास सारख्याच स्वरुपाची असली तरी ‘बडगे’ मात्र वेगवेगळ्या विषयांवर असतात. हे विषय मिरवणूक निघाल्यावरच कळतात. बहुदा एखाद्या बड्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची प्रतिकृतीही विशेष आकर्षण असते. म्हणूनच ‘मारबत’ व ‘बडगे’ ही मिरवणूक नागपूरच्या वैशिष्ट्यात भर टाकणारी आहे. यंदा पिवळी मारबतला १३४ तर काळी मारबतला १३८ वर्ष पूर्ण झाली आहेत.( छायाचित्रे -  मुकेश कुकडे, संजय लचुरिया)

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर