शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेलचा दर काय? रेशन दुकानावर आणि बाहेर 'एवढ्याला' मिळतेय; एलपीजी टंचाईमुळे लोक वळले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:21 IST

Kerosene Rate Pune Today Marathi: एलपीजी टंचाईमुळे नागरिकांची स्टोव्ह दुरुस्तीसाठी गर्दी. रेशनवर पुन्हा रॉकेल उपलब्ध. वाचा सविस्तर वृत्त.

मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून, राज्यात आता 'रॉकेल' (केरोसिन) युगाचे पुनरागमन झाले आहे. गॅस संपण्याच्या भीतीमुळे आणि नवीन सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याने, लोकांनी अडगळीत पडलेले स्टोव्ह बाहेर काढले आहेत. यामुळे बाजारात रॉकेलच्या मागणीत वाढ झाली असून दरांमध्येही मोठी तफावत दिसून येत आहे.

रॉकेलचे ताजे दर सध्या पुण्यातील बाजारपेठेत रॉकेल खालील दराने मिळत आहे:

रेशन दुकान : ₹६० प्रति लिटर.

काळा बाजार : ₹१०० ते ₹१२० प्रति लिटर.

रेशनिंगवर रॉकेल पुन्हा उपलब्धगेल्या काही वर्षांत रेशनवरील रॉकेल बंद करण्यात आले होते. मात्र, सध्याची आणीबाणीची परिस्थिती आणि एलपीजी शॉर्टेज पाहता, सरकारने पुन्हा एकदा रेशन दुकानांवर रॉकेलचा पुरवठा सुरू केला आहे. प्रामुख्याने ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही किंवा ज्यांचे सिलिंडर वेळेवर येत नाहीत, अशा लोकांसाठी हा मोठा आधार ठरत आहे.

'पॅनिक बाइंग' आणि काळा बाजारलोकांमध्ये सध्या पॅनिक बाइंग सुरु झाले आहे. इराण युद्द सुरु झाल्यानंतर एलपीजीसाठी नंबर लावण्यास सुरुवात झाली होती. ती संपत नाही तोच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत कोरोना लॉकडाऊन सारखी परिस्थिती उद्भवू शकते, असे सांगितल्याने लोकांनी पेट्रोल, डिझेलसाठी देखील रांगा लावण्यास सुरुवात केली. त्यात कंपन्यांनी इंधनाचे दर वाढतील म्हणून पेट्रोल पंपांनाच पुरवठा कमी केला. याचा परिणाम अफवा आणि पॅनिक बाइंग वाढण्यावर झाला. 

महाराष्ट्राचे केरोसीन (रॉकेल) वाटप१) एकूण वाटपकेंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यास ३,७४४ KL (३७,४४,००० लिटर) रॉकेल वाटप केले आहे.२)  प्रति लाभार्थीप्रति कुटुंब/प्रति शिधापत्रिका ३ (तीन) लिटर रॉकेल अनुज्ञेय राहील.

कुणाला मिळणार रॉकेल?◼️ AAY व PHH शिधापत्रिकाधारकांना रॉकेल वितरणास प्राधान्य देण्यात येईल.◼️ रॉकेल विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करुन रॉकेल उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक देखील रॉकेल मिळण्यास पात्र असतील.◼️ ज्या कुटंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील रॉकेल उपलब्धतेनुसार रॉकेल वितरणास पात्र राहतील. (ग्रामपंचायत रहिवासी दाखला पुरावा ग्राह्य धरण्यात यावा.)◼️ स्थलांतरीत मजूर देखील रॉकेल उपलब्धतेनुसार रॉकेल वितरणास पात्र राहतील. (केंद्र शासनाचे/राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Kerosene Prices Surge Amid LPG Shortage: Ration Shops to the Rescue

Web Summary : Kerosene demand spikes as LPG shortages hit Maharashtra due to Middle East tensions. Ration shops restart kerosene distribution at ₹60/liter, while black market prices soar. Priority to AAY, PHH cardholders; others may qualify based on availability.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCylinderगॅस सिलेंडरUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण