शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिल्लीत काय घडले? राज ठाकरेंनी दोन जागा मागितल्या; अमित शाह यांनी विधानसभेचाही शब्द देणे टाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 09:24 IST

Raj Thackeray-Amit Shah Meeting: राज ठाकरेंची मनसे किती जागा लढविणार ते महापालिका, विधानसभा निवडणुकीचे काय ठरणार यावरही चर्चा रंगली होती. आता या दोघांच्या बैठकीत काय ठरले याची माहिती समोर येत आहे. 

मंगळवारचा दिवस राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या चर्चेचा ठरला. राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत काय झाले, याचबरोबर राज ठाकरे एनडीएत (महायुतीत) जाणार की नाही याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. राज ठाकरेंची मनसे किती जागा लढविणार ते महापालिका, विधानसभा निवडणुकीचे काय ठरणार यावरही चर्चा रंगली होती. आता या दोघांच्या बैठकीत काय ठरले याची माहिती समोर येत आहे. 

राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्याकडे लोकसभेच्या दोन जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. राज यांनी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई जागेचा प्रस्ताव ठेवला होता. यावर शाह यांनी एकच जागा शक्य असल्याचे सांगितले आहे. तर दुसरी जागा देणे कठीण असल्याचे म्हटले. यानंतर राज यांनी लोकसभेनंतर पुढे काय, असे विचारले. यावर सध्या कोणताही शब्द देणे शक्य नसल्याचेही शाह यांनी म्हटल्याचे समजते आहे. 

विधानसभा एकत्र लढवू, परंतु तेव्हाचे तेव्हा ठरवू असे अमित शाह यांनी राज यांना म्हटल्याचे समजते आहे. राज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आधी यासंबंधी चर्चा केली होती. यानंतरच ते दिल्लीला जायला तयार झाले होते. मुंबईतील बैठकीत मनसेने तीन जागांचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु तिथे याला नकार देण्यात आला होता. यानंतर दोन जागांचाही प्रस्ताव शाह यांनी फेटाळला आहे. 

मनसेची ताकद किती?राज ठाकरे कोणता निर्णय घेतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ३६ पैकी केवळ २५ मतदारसंघांत निवडणूक लढवत मिळवलेली पाच लाखांच्या आसपास मते मिळाली होती. तेवढी मते येत्या  लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळणार का? व मिळाली तर कुणाच्या विजयात मोजली जाणार हा चर्चेचा विषय आहे. मनसेचे उमेदवार २०१९ मध्ये माहीम, मागाठाणे, शिवडी, मुलुंड, भांडूप, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या सात ठिकाणी दुसऱ्या स्थानावर होते, तर १५ ठिकाणी तिसऱ्या स्थानावर होते. य़ामुळे मनसेची मते निर्णायक ठरतील अशी अपेक्षा भाजपाला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र