शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

...त्याचा बाप सांगतोय अजून काय हवं?; अजित पवारांचा पार्थला भक्कम पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 6:23 PM

देशावर, राज्यावर संकट येतं तेव्हा सामुदायिक मुकाबला करायचा असतो

ठळक मुद्देपुण्यात वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर पुण्यातील परिस्थितीचा आढावा

पुणे: पार्थ पवार सिंगापूरला काय कुठेही गेलेले नाहीत. मागच्या ३ ते ४ महिन्यात कुठेही गेलेले नाहीत. त्याचा पासपोर्ट दाखवू का? त्याचा बाप सांगतोय अजून काय हवं? अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार सिंगापूरला गेले होते या अफवेचा खरपूस समाचार घेतला.  पुण्यात वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर पुण्यातील परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ झाली आहेत. तर पुण्याचा आकडा देखील २१ वर पोहचलेला आहे. त्यामुळे कोरोनाच्याबाबत सरकार, आरोग्य विभाग , जिल्हा प्रशासन यांनी दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालक करावे. कोणत्याही प्रकारचे राजकीय , सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करु नका.नियोजित कार्यक्रम पुढे ढकलावे. मुख्यमंत्री सातत्याने मुख्यालयात थांबून काम करत आहेत. ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलत आहेत. केंद्राकडून निधी घेतलेला नाही.राज्य सरकारकडे आहे. काळजी करू नका. खासगी व्यावसायिक घरात बसूनही काम करू शकतात. ते कर्मचाऱ्यांची काळजी घेऊन काम करू शकतात.अजून त्याबाबत कोणताही निर्णय नाही. काही सोसायट्यांमध्ये परदेशातून आलेल्या लोकांना घेत नाहीत. तो बाधित नसेल तर त्यांना सोसायटीत येऊ द्यावे. लोकांनी शक्यतो घरात थांबावे. देशावर, राज्यावर संकट येतं तेव्हा सामुदायिक मुकाबला करायचा असतो. हे आपलं कर्तव्य आहे.   पिंपरी चिंचवड, पुण्यात सर्व व्यवहार बंद आहेत. ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार आहे. पहिला, दुसरा टप्पा झाला पण आता तिसरा सुरू होतोय. पुढचे टप्पे महत्वाचे आहेत. देशाचे पंतप्रधान यांनी जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. आपणही त्याची अंमलबजावणी करायला हवी. लोकल, सार्वजनिक वाहतूक ही अत्यावश्यक सेवा पुरवणा?्यांसाठी आहे. मात्र तरीही गर्दी होत असेल तर बंद करावी लागेल. असा निर्णय फक्त मुंबईत नाही तर पुण्यातही होऊ शकतो.  कंपनी मालकांनी कामगारांशी माणुसकीने वागावे. हातावर पोट असणा?्यांची परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे खासगी आस्थापना बंद कराव्यात. आज 25 टक्के स्टाफ आला तर उद्या दुसरा 25 टक्के स्टाफ यावा. सर्व रजिस्ट्रेशन बंद केली आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारsingaporeसिंगापूर