शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘बालकुमार’ला सापत्न वागणूक का?

By admin | Updated: February 12, 2015 03:23 IST

अखिल भारतीय साहित्य तसेच नाट्यसंमेलनाला राज्य शासनाकडून अर्थसाह्य दिले जाते. मात्र मराठी बालकुमार साहित्य संमेलन भरविताना

पुणे : अखिल भारतीय साहित्य तसेच नाट्यसंमेलनाला राज्य शासनाकडून अर्थसाह्य दिले जाते. मात्र मराठी बालकुमार साहित्य संमेलन भरविताना आयोजकांना पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे या संमेलनालाच सापत्न वागणूक का दिली जाते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बालकुमार साहित्य संमेलनाचे यंदाचे २६वे वर्ष असून, केवळ कोकणमधील ओणी गावात मधुमंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संमेलनाव्यतिरिक्त इतर वेळी शासनाकडून कोणताही निधी मिळालेला नाही. किमान ५ लाख रुपयांचा निधी मिळावा यासाठी बालकुमार साहित्य संस्थेकडून गेल्या वर्षी साहित्य संस्कृती मंडळासह शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्याला उत्तर मिळाले नसल्याची खंत संस्थेचे प्रमुख कार्यवाह सुनील महाजन यांनी व्यक्त केली.कोणतेही संमेलन आयोजित करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. मात्र दरवर्षी बालकुमार साहित्य संस्थेचे पदाधिकारी आणि निमंत्रित संस्था निम्मा निम्मा खर्च उचलून संमेलनाचा गाडा पुढे नेत आहेत. आम्ही काम करणे थांबवले तर बालकुमार साहित्य संमेलन बंद होईल, ते बंद झाले तर ग्रामीण भागात जिथे संमेलन भरविले जाते तेथील मुले दर्जेदार बालसाहित्यापासून वंचित राहातील. मुलांमध्ये साहित्याची गोडी लागावी हा मुख्य उद्देश आहे, असे ते सांगतात. संमेलनाला थोडातरी निधी मिळावा ही अपेक्षा करणे चुकीचे आहे का? असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)