"अजित दादांनंतर काय? कुठे? कसे?; मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष राहणार नाही, माझ्यावर...!"; प्रफुल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:51 IST2026-02-03T14:50:08+5:302026-02-03T14:51:39+5:30
"आता बाहेरचे लोक आम्हाला सल्ले देत आहेत. ज्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंधही नाही. आमचा पक्ष आहे, आम्ही योग्यच निर्णय घेणार आहोत आणि माझ्या शिवया घेणार आहोत. म्हणजे मी पक्षाचा अध्यक्ष राहणार नाही," असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

"अजित दादांनंतर काय? कुठे? कसे?; मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष राहणार नाही, माझ्यावर...!"; प्रफुल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणरा? यासंदर्भात राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चा सुरू झाली होती. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. "आता बाहेरचे लोक आम्हाला सल्ले देत आहेत. ज्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंधही नाही. आमचा पक्ष आहे, आम्ही योग्यच निर्णय घेणार आहोत आणि माझ्या शिवया घेणार आहोत. म्हणजे मी पक्षाचा अध्यक्ष राहणार नाही," असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
पटेल म्हणाले, "आमच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्नांसंदर्भात विविध प्रकारच्या उलट सुटल चर्चा सुरू आहेत. आम्ही आमच्या पक्षाचा नेता निवडणार की दुसऱ्या कुण्या व्यक्तीला निवडणार. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एक पक्ष आहोत. नेतृत्वाचे दोन भाग आहे. पहिला आहे. विधिमंडळ आणि दुसरा आहे राजकीय पक्ष. विधिमंडळाचा भाग संपला. मी राष्ट्रिय कार्याध्यक्ष, मी सांगितल्या प्रमाणे, मी अजित दादा आणि पवार साहेबांसोबत काम केले आहे. अजित दादांच्या निधनानंतर, या सर्वप्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी कुणावर राहणार, तर प्रफुल पटेलांवर राहणार. मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याने विधिमंडळ आणि राष्ट्रीय अध्यक्षासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि महाराष्ट्रात सुनिल तटकरे यांच्यावर आहे.
राष्ट्रवादी पक्षाकडून कुण्याही व्यक्तीने, आम्ही पुढे काय पावले उचलावेत यासंदर्भात इंडिकेशन्सदेखील दिलेले नाहीत. आम्हाला सर्वांच्या भावना समजतात. त्यापद्धतीने आम्ही सुनेत्रा ताईंसंदर्भात निर्णय केला. आणि पक्षाचा निर्णयही आम्ही त्याच पद्धतीने घेणार आहोत.
"तर त्यांना लाज वाटायला हवी" -
आता बाहेरचे लोक आम्हाला सल्ले देत आहेत. ज्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंधही नाही, ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेकडून साधे एक मतही मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी आमच्या बद्दल काही वक्तव्य देणे योग्य आहे का? १९५२ पासून माझ्या वडिलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले. मीही लोकसभेत अनेकवेळा महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कुणी कमेंट करत असेल, तर त्यांना लाज वाटायला हवी.
पटेल म्हणाले, "मी महाराष्ट्राच जनप्रतिनिधी म्हणून येथे बसलेलो आहोत. पक्षाचा निर्णय योग्य पद्धतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्या शिवायच होईल. यापलिकडे मी आणखी काय सांगावं? आमच्याकडून कधी यासंदर्भात विधानही आलेले नसताना, उगाचच्या उगाच असा प्रकारचे वादळ निर्माण करणे आणि आमच्या पक्षात संशयाचे वातावरण निर्माण करणे हे अत्यंत घेणेरडी गोष्ट आहे."
"आमचा पक्ष आहे आम्ही योग्यच निर्णय घेणार आहोत आणि माझ्या शिवया घेणार आहोत. म्हणजे मी पक्षाचा अध्यक्ष राहणार नाही. अजित दादांनंतर काय? कुठे? कसे? ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी आहे. ती मी येग्य रितिने पार पाडत आहे, असे पलेट यांनी स्पष्ट केले."