शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

West Bengal Election 2021: “इथे आहेत त्या सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्यात, नोकरी कुठून देणार हे?”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 8:14 PM

west bengal assembly election 2021: केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र जारी केले. त्यावर आता काँग्रेसकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देभाजपच्या संकल्पपत्रावर काँग्रेसची टीकाअलीकडेच भाजपने केले होते संकल्पपत्र जारीट्विटरच्या माध्यमातून जाहीरनाम्यावर निशाणा

मुंबई : देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणसंग्राम आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election 2021) तृणमूल काँग्रेस आणि भाजपने आपापली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र जारी केले. त्यावर आता काँग्रेसकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्या आणि नोकऱ्या कुठून देणार, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. (west bengal assembly election 2021 congress leader bhai jagtap criticize bjp over manifesto)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपने संकल्पपत्र म्हणजेच निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये प्रत्येक घरात एक नोकरी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावरूनच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपवर टीका केली आहे. एक ट्विट करून भाई जगताप यांनी भाजपच्या संकल्पपत्रावर निशाणा साधला आहे. 

काय म्हणाले भाई जगताप?

“बंगालमध्ये भाजपाचे घोषणपत्र जारी – प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देणार… इथे आहेत त्या सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्यात, नोकरी कुठून देणार हे..??”, असे ट्विट करत भाई जगताप यांनी भाजपला टोला लगावला आहे. रोजगार, सामाजिक सुरक्षा बळकट करणे आणि नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीला मंजुरी यांसारख्या उपाययोजनांद्वारे ‘सोनार बांगला’ची निर्मिती करण्याचे आश्वासन देणारा जाहीरनामा भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी जारी केला आहे. 

गुड न्यूज! आता घरबसल्या ऑर्डर करा; पेट्रोल-डिझेलची मुंबई व दिल्लीत होम डिलिव्हरी

दरम्यान, भाई जगताप हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यानंतर अमृता यांनी दिलेलं उत्तर आणि त्यावर पुन्हा जगताप यांनी साधलेला निशाणा यामुळे त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. आता थेट राजकीय व्यक्त करण्याऐवजी ट्विटरवरुन व्यक्त होणाऱ्या भाई जगताप यांनी आता पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाहीर केलेल्या निवडणुक जाहीरनाम्यावरुन निशाणा लगावला आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगतापPoliticsराजकारण