शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळे सेवाकर विभागाच्या रडारवर!

By admin | Updated: August 16, 2014 03:02 IST

दिमाखदार लग्नसोहळ्यापासून ते घरगुती सोहळ्याच्या किंवा कंपनीच्या सोहळ्याच्या प्रसिद्धीपर्यंत कोणत्याही गोष्टीचे नियोजन करताना आता अधिक सावधानता बाळगणे गरजेचे

मनोज गडनीस, मुंबईदिमाखदार लग्नसोहळ्यापासून ते घरगुती सोहळ्याच्या किंवा कंपनीच्या सोहळ्याच्या प्रसिद्धीपर्यंत कोणत्याही गोष्टीचे नियोजन करताना आता अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे, कारण या आणि अशा सर्व गोष्टींत ‘सेवा’ दडलेली असल्याने त्यावर ‘सेवा कर’ भरणे बंधनकारक आहे, अन्यथा सेवा कर विभागाचे अधिकारी तुमच्या ऐन कार्यक्रमात दाखल होऊन पार्टीच्या रंगाचा बेरंग करू शकतात. केंद्रीय अर्थसंकल्पात अप्रत्यक्ष कराच्या लक्ष्यामध्ये वाढ केल्यानंतर, कर वसुली हे आव्हानात्मक असल्याची विभागांतर्गत चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर देशभरातील सेवा कर आयुक्तांची वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याशी बैठक झाली आहे. त्यात थेट वित्तमंत्र्यांनीच या अधिकाऱ्यांना ‘सक्रिय’ होण्याचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ‘सक्रिय’ होणे म्हणजे नेमके काय करायचे यावरदेखील या बैठकीत विस्तृत ऊहापोह झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध शहरांत अथवा गावात होणारे दिमाखदार लग्नसोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, सिनेतारकांचे कार्यक्रम यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षाकरिता अप्रत्यक्ष कराचे लक्ष्य ६ लाख २४ हजार कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.२०१३-१४ या आर्थिक वर्षात अप्रत्यक्ष कराचे संकलन ४ लाख ९६ हजार कोटी रुपये इतके झाले होते. त्या तुलनेत यंदाचे लक्ष्य २६ टक्के अधिक आहे.