शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

वेबसाइट-केमिस्ट अभद्र युती

By admin | Updated: May 3, 2015 04:55 IST

अवैधरीत्या सुरू असलेल्या आॅनलाइन औषधविक्रीतून भविष्यात आत्महत्या किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू शकतात, अशी भीती अन्न व औषध प्रशासनातील

पूजा दामले, मुंबईअवैधरीत्या सुरू असलेल्या आॅनलाइन औषधविक्रीतून भविष्यात आत्महत्या किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू शकतात, अशी भीती अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळेच आॅनलाइन औषधविक्री एफडीएने अत्यंत गांभीर्याने घेत ती रोखण्यासाठी विशेष सेलही स्थापन केला आहे.आॅनलाइन शॉपिंग साइट्सनी सुरू केलेल्या औषधविक्रीला प्रतिसाद का मिळतो, या प्रश्नावर एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, मुळात या पद्धतीने औषध विकत घेण्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन आवश्यकता नाही. त्यामुळे अन्य औषधांसोबत झोपेच्या गोळ्या, गुंगी आणणारे कफ सीरप सहजरीत्या कोणाच्याही हाती पडू शकतात. प्रत्यक्षात अशी औषधे डॉक्टरच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय ग्राहकाला देणे गुन्हा आहे. अशी औषधे हातात पडल्यास त्यातून गुन्हा घडू शकतो. तरुण मुले अशा औषधांचा नशेसाठी सहज वापर करू शकतात. औषधांची आॅनलाइन खरेदी केल्यास ती दहा ते पंधरा टक्के स्वस्त मिळतात, हेही महत्त्वाचे कारण असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. आॅनलाइन साइट्सवर विकली जाणारी औषधे ही प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जातात. हे कायद्याचे उल्लंघन आहेच, पण त्याचा दुष्परिणाम असा की स्वत:च्या मनाने औषधे घेण्याची वृत्ती वाढेल. असे झाल्यास कालांतराने शरीरावर औषधांचे परिणाम होणार नाहीत. त्यामुळे आॅनलाइन औषधविक्रीला आळा घालणे अत्यावश्यक बनले. त्यासाठी ड्रग्ज टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी बोर्डासमोर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच अन्य राज्यांमधल्या एफडीए आयुक्तांना पत्रव्यवहार करून आॅनलाइन औषधविक्रीबाबत सतर्क करण्यात आले आहे, असे महाराष्ट्राचे एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.