आमचे श्रेय आम्ही घेणारच - उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By Admin | Updated: June 10, 2015 09:44 IST2015-06-10T09:44:33+5:302015-06-10T09:44:33+5:30

कोस्टल रोड पूर्ण होऊ जनतेच्या चेह-यावर फुललेले हसू पाहावे हेच आमचे श्रेय असून ते आम्ही नक्कीच घेऊ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे.

We will take credit for us - Uddhav Thackeray's BJP tunes | आमचे श्रेय आम्ही घेणारच - उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

आमचे श्रेय आम्ही घेणारच - उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

 

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १० - कोस्टल रोड पूर्ण होऊ जनतेच्या चेह-यावर फुललेले हसू पाहावे हेच आमचे श्रेय असून ते आम्ही नक्कीच घेऊ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. आमची बांधिलकी जनतेशी असून त्यांच्यासाठी चांगले काम करावे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच शिकवले असेही त्यांनी म्हटले आहे. 
मुंबईतील दहा हजार कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. या कोस्टल रोडवरुन भाजपा व शिवसेनेमध्ये श्रेयाची लढाई सुरु असून बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भाजपाला चिमटा काढला आहे. कोस्टल रोड या प्रकल्पाची घोषणा शिवसेनेने केली होती, या प्रकल्पाचा आराखडा व योजना आखण्यासाठी आम्ही दिवसरात्र तज्ज्ञांशी चर्चा केली होती असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले. आमच्यासाठी प्रकल्पाचे श्रेय महत्त्वाचे नसून मुंबईकरांच्या सुखासाठी हे काम हाती घेतले आहे असे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: We will take credit for us - Uddhav Thackeray's BJP tunes