शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

टप्प्याटप्प्याने इंग्रजीचे महत्त्व कमी करू

By admin | Updated: December 24, 2014 00:40 IST

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या दरम्यान प्रशासन आणि दैनंदिन कामकाजातून इंग्रजीचे महत्त्व कमी करून मराठीचे महत्त्व वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील,

विनोद तावडे : मराठीत अभिप्राय लिहिण्याची अधिकाऱ्यांना सक्तीनागपूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या दरम्यान प्रशासन आणि दैनंदिन कामकाजातून इंग्रजीचे महत्त्व कमी करून मराठीचे महत्त्व वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मराठी भाषा विभाग व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिले.राज्याचे मराठी भाषाविषयक धोरण आणि मराठी विद्यापीठाची स्थापना यासंदर्भात हेमंत टकले यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला तावडे यांनी उत्तर दिले.मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मराठी भाषेचा प्रसार महत्त्वाचा आहे. त्यासाठी मराठी माणसांनीच पुढाकार घेऊन या प्रयत्नांना एक चळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन तावडे यांनी केले. खरेदी-विक्रीच्या व्यवहारातही मराठीचाच वापर जास्तीतजास्त करावा. त्यामुळे विक्रेत्यांनाही मराठी शिकणे भाग पडेल व नंतरच्या काळात कॉल सेंटर व तत्सम ठिकाणी मराठीचा वापर वाढेल, असे तावडे म्हणाले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. हा दर्जा प्राप्त झाल्यास केंद्राकडून १०० ते १५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला प्राप्त होईल व त्यातून मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.मराठी भाषेचा वापर शासकीय पातळीवर अधिक प्रमाणात व्हावा, यासाठी सचिवांना त्यांच्या फाईल्सवर अभिप्राय मराठीतूनच लिहिण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या आदेशाची कशी अंमलबजावणी होते यावर सरकारचे लक्ष असणार असून, अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिताना याचा विचार केला जाईल, असे तावडे म्हणाले.मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक आमदाराने एक मराठी शाळा दत्तक घेऊन तिचा विकास ‘आदर्श’ शाळा म्हणून करावा; तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायालयात मराठी भाषेचा वापर व्हावा, यासाठी कायद्याचे शिक्षण मराठीतून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले. मराठीतून युक्तिवाद करणाऱ्या वकिलांना प्राधान्य देऊ, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)