शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या 'त्या' भूमिकेनं आम्हाला धक्काच बसला; शरद पवारांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 11:54 IST

या सगळ्यांना सन्मानानं वागणूक देऊन एकत्र येण्याचा विचाराला त्यांनी हातभार लावला, दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसशी त्यांचा संघर्ष होता. पण तो संघर्ष कायमचा होता, असं मला वाटत नाही.

मुंबईः बाळासाहेबांची विचारधारा आणि कामाची पद्धत भाजपाच्या विचारांशी सुसंगत होती, असं मला कधीच वाटलं नाही. बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपाच्या लोकांच्या कामाच्या पद्धतीत जमीन आस्मानचा फरक आहे, असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले आहेत.(Sharad Pawar Sanjay Raut Interview) संजय राऊतांनी सामनासाठी घेतलेल्या खास मुलाखत ते बोलत होते. बाळासाहेबांनी सन्मान केला तो काही व्यक्तींचा केला. त्यांनी अटल बिहारी वाजपेयींचा केला. त्यांनी अडवाणींचा केला. त्यांनी प्रमोद महाजन यांचा केला. या सगळ्यांना सन्मानानं वागणूक देऊन एकत्र येण्याचा विचाराला त्यांनी हातभार लावला, दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसशी त्यांचा संघर्ष होता. पण तो संघर्ष कायमचा होता, असं मला वाटत नाही.

सेना ही काँग्रेसच्या कायमच विरोधात होती, असं वाटत नाही. कदाचित बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या देशातील एकमेव संघटना अशी असेल, की एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरून सत्ताधारी पक्षातील प्रमुख लोकांना स्वतःच्या पक्षाच्या भविष्याची काही स्थिती यत्किंचीत तमा न बाळगता पाठिंबा द्यायचा. ते शिवसेनेच्या नेत्यांनीच केलं. ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या विरोधात अख्खा देश होता, त्यावेळी शिस्त आणणारं नेतृत्व म्हणून त्याच्याबरोबर बाळासाहेब उभे राहिले. नुसतेच उभे राहिले नाही, तर आम्हाला लोकांना त्यावेळी धक्काच बसला. तेव्हा बाळासाहेबांनी भूमिका घेतली की महाराष्ट्राच्या निवडणुकीला उमेदवारसुद्धा उभा करणार नाही, असंही पवारांनी सांगितलं आहे. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)

गेली पाच वर्षं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायच्या आधी सेना आणि भाजपाचं सरकार होतं. पण सेनेच्या विचाराचा मतदार आणि सेनेचा कार्यकर्ता यांच्यात सरकारबद्दल अस्वस्थता होती. सेनेची काम करण्याची पद्धत ठोसपणानं गोष्ट राबवायची होती. भाजपाने त्यांना गप्प बसवण्याचा, बाजूला ठेवण्याची भूमिका सातत्यानं घेतली. महाराष्ट्रातल्या जनतेने जी पाच वर्षं पाहिली, ती भाजपाचं सरकार असल्याचीच होती. याच्याआधी असं नव्हतं. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली युती सरकार होतं. नेतृत्व शिवसेनेकडे होते. बाळासाहेबांची भक्कम भूमिका होती. मागच्या पाच वर्षांत सेनेला जवळपास बाजूला केलं आणि भाजपा म्हणजे हेच खरे राज्यकर्ते आणि पुढच्या काळात भाजपाच्या विचारानेच चालणार ही भूमिका घेऊन पावलं टाकली. ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नव्हती. दुसरं कुणी राजकारण करू शकत नाही, असं वाटत होतं, असं म्हणत पवारांनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. 

मी येणार, मी येणार आणि मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. कुठल्याही राज्यकर्त्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहित धरायचं नसतं. मीच येणार ही भूमिका घेऊन मतदाराला गृहित धरलं तर तो सहन करत नाही. त्यात थोडासा दर्प आहे आणि धडा शिकवला पाहिजे, असं जनतेनं ठरवलं.  कुठल्याही लोकशाहीतला नेता अमरपट्टा घेऊन आलोय, असा विचार करूच शकत नाही. इंदिरा गांधींनाही पराभव पाहावा लागला, अटलबिहारी वाजपेयींनाही पराभव पाहावा लागला. राजकारणातल्या लोकांपेक्षा मतदार शहाणा आहे. चाकोरीच्या बाहेर पाऊल टाकतोय असं दिसलं तर तो धडा शिकवतो, असंही पवार म्हणाले आहेत. 

हेही वाचा

भाजपाने सत्ता कशामुळे गमावली?; शरद पवारांनी 'मी पुन्हा येईन'ची गोष्ट सांगितली

'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली": शरद पवार

लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत

कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार

CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत