आमच्याकडे कोणीही सुपर सीएम नाही, एकनाथ शिंदे हेच आमचे नेते : देवेंद्र  फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 06:46 IST2022-07-16T06:45:50+5:302022-07-16T06:46:22+5:30

गेले काही दिवस काही प्रसंगांचा दाखला देत फडणवीस हे शिंदे यांना ‘डिक्टेट’ करत असल्याची टीका केली जात असताना फडणवीस यांनी शुक्रवारी सडेतोड उत्तर दिले.

We have no super CM Eknath Shinde is our leader said deputy cm Devendra Fadnavis maharashtra | आमच्याकडे कोणीही सुपर सीएम नाही, एकनाथ शिंदे हेच आमचे नेते : देवेंद्र  फडणवीस

आमच्याकडे कोणीही सुपर सीएम नाही, एकनाथ शिंदे हेच आमचे नेते : देवेंद्र  फडणवीस

मुंबई : कोणत्याही सरकारमध्ये सुपर सीएम असा प्रकार नसतो. आमच्याकडेही नाही. मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आणि आमचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, पण काहींना हे बघवत नसल्याने ते टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

गेले काही दिवस काही प्रसंगांचा दाखला देत फडणवीस हे शिंदे यांना ‘डिक्टेट’ करत असल्याची टीका केली जात असताना फडणवीस यांनी शुक्रवारी सडेतोड उत्तर दिले. फडणवीस यांनी  शिंदे यांच्यासमोरील माईक खेचून घेतला. मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या पत्र परिषदेत फडणवीस यांनी शिंदे यांच्याकडे चिठ्ठी सरकावली, अशा बातम्या पसरविल्या गेल्या. तसेच सकाळी ९ वाजता कोणी बोलले की त्याचा प्रतिध्वनी ११ वाजता उमटत असतो. 

त्याचाच परिणाम म्हणून मी माईक खेचला, चिठ्ठी दिली अशा बातम्या येतात. खरे तर त्यावेळी पत्रकारानेच हा प्रश्न फडणवीसांना विचारला असे म्हटले होते, म्हणून तो माईक मी घेतला. मात्र, तो प्रश्न म्यूट करून बातम्या चालविल्या. मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी देण्यात गैर काय, असा सवालही फडणवीस यांनी केला.  

Web Title: We have no super CM Eknath Shinde is our leader said deputy cm Devendra Fadnavis maharashtra