शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात पाणवठे आटताहेत!

By admin | Updated: January 31, 2015 05:11 IST

यंदा दुष्काळ, अत्यल्प पावसाचा सर्वाधिक फटका वन्यप्राण्यांना बसण्याचर चिन्हे आहेत़ उन्हाळा सुरू होण्यास अवधी असला तरी मेळघाट

अमरावती : यंदा दुष्काळ, अत्यल्प पावसाचा सर्वाधिक फटका वन्यप्राण्यांना बसण्याचर चिन्हे आहेत़ उन्हाळा सुरू होण्यास अवधी असला तरी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाणवठे आटू लागले आहेत. परिणामी एप्रिल, मे महिन्यात काय स्थिती राहील, याचा अंदाज घेत वनअधिकाऱ्यांनी आतापासून नियोजन आखायला सुरुवात केली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा परिसर दऱ्याखोऱ्यात विभागला आहे. वाघांच्या संरक्षणासाठी अन्य वन्यप्राण्यांचे संगोपन करताना त्यांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनाधिकारी नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती करतात. मात्र, कृत्रिम पाणवठ्याची स्थिती दयनीय झाली असून, सुधारण्याची तयारी केली जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जमीन खडकाळ, वाहते पाणी असलेली आहे. त्यामुळे पाणवठ्यात पाणी कायम राहील, याची शाश्वती नसल्याचे वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मेळघाटात ६००पेक्षा अधिक नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यापैकी सुमारे १०० पाणवठे कोरडे पडत आहेत़ उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.मेळघाटात सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सागवान वृक्ष जमिनीत ओलावा टिकवून ठेवत नाहीत. त्या तुलनेत ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मिश्र रोपवन असल्याने येथे पाण्याची समस्या अधिक प्रमाणात उद्भवत नसल्याचे चित्र आहे. परंतु संभाव्य स्थिती लक्षात घेता व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे़ वाहत्या झऱ्यांतून पाणी साठवणीच्या उपाययोजना करीत असताना मेळघाटातील पाच नद्यांवर सिंचन क्षमता वाढविणाऱ्यावरही भर दिला जात आहे. गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविताना दमछाक होत असली तरी उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाणीटंचाई भासू नये, यासाठी कृती आराखडा तयार केला जात आहे. (प्रतिनिधी)