शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यास नाशिकचे पाणी रेल्वेने द्यावे!

By admin | Updated: October 19, 2015 02:58 IST

गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १.३६ टीएमसी पाणी वहन मार्गाने सोडण्यास जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी कडाडून विरोध दर्शविला आहे

नाशिक : गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १.३६ टीएमसी पाणी वहन मार्गाने सोडण्यास जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. त्याऐवजी रेल्वे किंवा टँकरने पाणी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता गंगापूर धरणावर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आ. अनिल कदम व आ. कदम व आ. राजाभाऊ वाजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.गंगापूर ते जायकवाडी हे अंतर २३४ कि.मी. असून, प्रस्तावित १.३६ टीएमसी (३८.३८ एमसीएफटी) पाणी हे वहन मार्गाने जायकवाडीपर्यंत पोहोचू शकणार नाही. वीजपुरवठा खंडित करून हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. शिवाय वहन मार्गाने ८० टक्के पाण्याची गळती होऊन ते वाया जाणार आहे. २०१२-१३मध्येही मराठवाड्यात टंचाईची स्थिती उद्भवली तेव्हा तीन आवर्तने देण्यात आली होती, परंतु पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचू शकले नव्हते, असे कदम यांनी सांगितले. रेल्वेवॅगनद्वारे पाणी पोहोचविता येऊ शकेल, असेही कदम म्हणाले.