दिलासा : धरणांचा पाणीसाठा वाढू लागला, जुलैतील कोसळधारांमुळे जलसंचय ३० टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 06:38 IST2022-07-11T06:37:36+5:302022-07-11T06:38:12+5:30
जून महिन्यांत दडी मारून बसलेला पाऊस आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार कोसळू लागला आहे.

दिलासा : धरणांचा पाणीसाठा वाढू लागला, जुलैतील कोसळधारांमुळे जलसंचय ३० टक्क्यांवर
मुंबई : जून महिन्यांत दडी मारून बसलेला पाऊस आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार कोसळू लागला आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने जलाशयांतील साठ्यात वाढ होऊ लागली असून, आतापर्यंत राज्यातील सर्व धरण प्रकल्पांत सरासरी ३०.२७ टक्के एवढा उपयुक्त साठा निर्माण झाला आहे. तर गेल्या वर्षी हा साठा सरासरी २७.६८ टक्के एवढा होता. आजपर्यंत झालेल्या पावसाने किंचित दिलासा दिल्याचे चित्र तूर्तास तरी आहे.
पाणीसाठा...
विभाग टक्के
अमरावती ३७.८९
औरंगाबाद २९.४९
कोकण ५७.१५
नागपूर ३३.३२
नाशिक २५.३६
पुणे २३.४१
एकूण ३०.२७
- महाराष्ट्रातील मोठ्या धरणांतील जलसाठ्यांचा विचार करता कोकणात बऱ्यापैकी जलसाठा निर्माण झाला असून, ही टक्केवारी ५५.६८ आहे. त्या खालोखाल अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक विभागातील धरणांचा नंबर लागत असून, सर्वात खाली पुण्यातील धरणांचा साठा असून ही टक्केवारी २३.१८ आहे.
- दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी मुंबई महापालिकेने लागू केलेली दहा टक्के पाणी कपात मागे घेण्यात आली असून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसाने हे तलाव भरभरून वाहणार आहेत.
१ जूनपासून आतापर्यंत
पाऊस विभागवार / टक्क्यांमधील सरासरीच्या तुलनेत अधिक
कोकण गोवा - २० टक्के अधिक
१ हजार २५२.३ मि.मी.
मध्य महाराष्ट्र - ३ टक्के अधिक
२३७.९ मि.मी.
मराठवाडा - ४३ टक्के अधिक
२६९.८ मि.मी.
विदर्भ - ८ टक्के अधिक
२८८ मि.मी.