शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भावर जलसंकट; अमरावती, नागपूर विभागात फक्त 18% पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 17:35 IST

राज्यात सध्या ३३.६० टक्के जलसाठा 

अमरावती : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील प्रकल्पांतील जलसाठा ३३.६० टक्क्यांवर स्थिरावला आहे. त्यात अमरावती व नागपूर विभागातील प्रकल्पांच्या जलसाठ्यानं तळ गाठला आहे. अन्य विभागांच्या तुलनेत विदर्भावरील जलसंकट गडद झालंय. त्यामुळे विदर्भात पाणीबाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.२३ एप्रिलच्या नोंदीनुसार राज्यातील ३२४६ जलप्रकल्पांमध्ये ३३.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी तो २६.८६ टक्के इतका होता. अमरावती विभागातील ४४३ प्रकल्पांमध्ये १९.३५ टक्के, नागपूर विभागातील ३८५ प्रकल्पांमध्ये १७.४४ टक्के, कोकणातील १७५ प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ५०.७१ टक्के, नाशिक विभागातील ५६१ प्रकल्पांमध्ये ३५.७४ टक्के, पुणे विभागातील ७२५ प्रकल्पांमध्ये ३८.९० टक्के आणि मराठवाडा विभागातील ९५७ प्रकल्पांमध्ये ३१.१७ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती व नागपूर विभागातील प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असल्यानं व तप्त उन्हानं मृत साठ्यात वाढ होत असल्यानं विदर्भातील जलसंकटात भर पडणार आहे.अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये १५.८३ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ३७.२८, तर ४९ लघु प्रकल्पांमध्ये केवळ २०.२० टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये १६.८६ टक्के, ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये २०.८१ टक्के, तर ३२६ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १७.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील सर्वाधिक मोठ्या गोसे खुर्द प्रकल्पात अवघा ६.४३ टक्के, तर अमरावतीच्या काटेपूर्णात ८.१० टक्के, अप्पर वर्धा ४०.६५ टक्के, खडकपूर्णा शून्य टक्के, नळगंगा १५.८२ टक्के, पेनटाकळी ११.२६ टक्के, अरुणावती ७.१०, तर इसापूर १.७१ टक्के, पूस १४.५७ टक्के, बेंबळा १३.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे. 

६७१ टँकरनं पाणीपुरवठाराज्यातील ६७१ गावे व २४७ वाड्यांमध्ये ६७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक ३९६ टँकरने मराठवाडा विभागात पाणी पुरवलं जात आहे. कोकणात ४८, नाशिक विभागात ८५, पुण्यात ०४, अमरावतीमध्ये १३७ टँकर चालवले जात आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये ४९३ टँकरनं पाणीपुरवठा केला जात होता. यंदा त्यात १७८ नं वाढ झाली आहे.

 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईnagpurनागपूरVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा