शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गावात सकाळी ९ वाजता होते सूर्यदर्शन

By admin | Updated: August 24, 2014 01:09 IST

मावळत्या सूर्यासाठी ब्रिटन, उगवत्या सूर्यासाठी जपान आणि मध्यरात्री उगवणाऱ्या सूर्यासाठी नॉर्वे प्रसिद्ध आहे. परंतु विदर्भात असे एक गाव आहे जेथे गेल्या एक दशकापासून सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो.

मोहन भोयर - तुमसरमावळत्या सूर्यासाठी ब्रिटन, उगवत्या सूर्यासाठी जपान आणि मध्यरात्री उगवणाऱ्या सूर्यासाठी नॉर्वे प्रसिद्ध आहे. परंतु विदर्भात असे एक गाव आहे जेथे गेल्या एक दशकापासून सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील हे छोटेसे गाव आहे बाळापूर. मानवनिर्मित टेकड्यांमुळे या गावात सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो. तुमसर तालुका मुख्यालयापासून ३५ कि़मी. अंतरावर बाळापूर (हमेशा) नावाचे लहानसे गाव आहे. सातपुडा पर्वत रांगात वसलेल्या या गावात बाराही महिने सूर्याची किरणे सकाळी ९ वाजतानंतर दिसतात. या गावाजवळच मॅगनीजची खुली खाण आहे. ही खाण ब्रिटिशकालीन असून हा संपूर्ण परिसर नैसर्गिक खनिज संपत्तीने नटलेला आहे. १०२ वर्षे जुन्या असलेल्या या खाणीवर केंद्र शासनाची मालकी आहे. खाण खुली असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात येते. रोज शेकडो टण भुसभुशीत माती आणि दगड बाहेर निघतात. ही माती आणि दगडाचे ढिगारे गावाच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण बाजूला टाकले जात असल्याने महाकाय उंचच उंच टेकड्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे तिन्ही ऋतूत सकाळी ९ वाजेपर्यंत सूर्याची किरणे गावात पोहोचतच नाहीत. ब्लास्टिंग आणि डम्पिंगमुळे गावात नेहमी धूळ असते. ही धूळ नाकातोंडाद्वारे शरीरात जाते. परिणामी नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. अनेकांना क्षयरोगाने ग्रासले असून या परिसरातील पाण्यात क्षार असल्यामुळे अनेकांचे दात पिवळे पडले आहेत. त्यांना हाडाचे विकारही जडले आहेत.खाण क्षेत्र वाढलेया खाणीत सुमारे १ हजार २०० कामगार कार्यरत आहेत. खाणीचे निश्चित क्षेत्र किती हे अधिकाऱ्यांनाच माहीत नाही. मॅगनीज दिसेल तिथे उत्खनन सुरू आहे. त्यामुळे खाणीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. २०० वर्षे पुरेल इतके मॅगनीज भूगर्भात आहे. या परिसरात जस्ट्रोपा नावाची वनस्पती लावण्याचे निर्देश शासनाने मॉईलला दिले आहेत. जस्ट्रोपोमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होते. परंतु, या परिसरात ही वनस्पती कुठेच दिसत नाही. अपघाताची प्रतीक्षागावाला भेट दिली असता मानवनिर्मित माती व दगडांची उंचच उंच दरड गावात प्रवेश करताच दिसून येते. ही दरड अत्यंत धोकादायक आहे. यामुळे संपूर्ण बाळापूर हे गाव गडप होण्याची भीती आहे. मॉईल प्रशासनाने येथे उपाययोजना केली नाही तर माळीणची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावकऱ्यांचे पुनर्वसन नाहीमॉईल प्रशासनाने कामगारांचे अन्यत्र पुनर्वसन केले नाही. मॉईलच्या प्रदूषणामुळे शेती नापीक झाली आहे. रोजगारासाठी गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी शहराकडे धाव घेतली आहे. खाण मंत्रालयानेही दखल घेतलेली नाही. स्थानिक बेरोजगार तथा शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी न देता परप्रांतीयांनाच स्थान दिले आहे.