कडाक्याच्या उन्हात अवकाळी पावसाचा इशारा, या दिवशी पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 08:21 IST2022-04-04T08:21:34+5:302022-04-04T08:21:52+5:30
उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. कारण हवामान खात्याकडील माहितीनुसार, ४ ते ७ एप्रिलपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.

कडाक्याच्या उन्हात अवकाळी पावसाचा इशारा, या दिवशी पावसाची शक्यता
मुंबई : उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. कारण हवामान खात्याकडील माहितीनुसार, ४ ते ७ एप्रिलपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. 
मुंबईसह राज्यात उन्हाचा तडाखाही बसत असून, बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३५ ते ४० अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. 
 ४ एप्रिल :  विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
 ५, ६ आणि ७ एप्रिल : 
कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.
तापलेली शहरे
अकोला    ४४
चंद्रपूर    ४३
मालेगाव    ४३
सोलापूर    ४१.६
परभणी    ४१.४
नांदेड    ४१.२
जालना    ४०.८
उस्मानाबाद    ४०.७
चिखलठाणा    ४०.६
पुणे    ३९.८
नाशिक    ३९.६
बारामती    ३९.१
चार ते पाच दिवस महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी पावसाचा अंदाज आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, 
वरिष्ठ शास्त्रज्ञ, 
भारतीय हवामान शास्त्र विभाग