शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग तयार झाले, पण अधिकाऱ्यांचे काय?

By admin | Updated: June 29, 2016 03:02 IST

महापालिकेत नव्याने निर्माण झालेल्या दोन प्रभागांना अजूनही अधिकारीच मिळालेला नाही.


कल्याण : महापालिकेत नव्याने निर्माण झालेल्या दोन प्रभागांना अजूनही अधिकारीच मिळालेला नाही. त्यामुळे तेथे नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. प्रभाग अधिकारी पदाच्या समकक्ष अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी महापालिकेत असतानाही लेखापाल अथवा अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या माथी हे पद मारले
जात आहे.
केडीएमसीत २७ गावे समाविष्ट झाल्यामुळे प्रभागांची संख्या १०७ वरून १२२ इतकी झाली. परिणामी अ, ब, क, ड, फ, ग, ह या सात प्रभागांबरोबर नव्या ‘ई’ या प्रभागाची निर्मिती झाली. तेथे नवीन प्रभाग अधिकाऱ्याची नियुक्तीही झाली. दरम्यान प्रभाग रचनेनुसार झालेल्या बदलात आणखी दोन नव्या प्रभागांची त्यात भर पडली. प्रभाग रचनेनुसार १ ते १० क्रमांकानुसार प्रभागांची निर्मिती करण्यात आली. आधीच्या ‘ड’ आणि ‘ई’ प्रभागांचे विभाजन करून दोन नवे प्रभाग निर्माण करण्यात आले. नुकत्याच प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. परंतु, नव्या प्रभागांमध्ये प्रभाग अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. चिंचपाडा व लोकग्राम परिसरात नव्या प्रभागांची कार्यालये थाटण्यात येणार आहेत.
सध्या महापालिकेत अनिल लाड, सुभाष भुजबळ, प्रकाश ढोले, मिलिंद धाट, गणेश बोराडे, लहू वाघमारे, विनय कुलकर्णी हे सहाय्यक आयुक्त आहेत. हे प्रभाग अधिकारी समकक्ष दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांची नेमणूक प्रभाग अधिकारी म्हणून करणे अपेक्षित असताना त्यांना मात्र अन्य विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. ते प्रभाग अधिकारी म्हणून काम करण्यास तयार नसल्याने या महत्त्वाच्या पदावर लेखापाल, अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.
>महिलेच्या हाती कारभार?
नव्या प्रभागांची जबाबदारी कोणावर सोपवायची, असा प्रश्न केडीएमसी प्रशासनाला पडला आहे. एका महिलेला प्रभाग अधिकारी पद देण्याचा विचार करण्याची वेळ प्रशासनावर ओढावल्याची सूत्रांची माहिती आहे.
>नियुक्तीची प्रक्रिया सुरू
यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद धाट यांच्याशी संपर्क साधला असता प्रभाग अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच नवीन प्रभागांत अधिकारी नेमले जातील, असे त्यांनी सांगितले.