शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

‘आरसी’ची प्रतीक्षा वाढतेय!

By admin | Updated: December 19, 2014 00:48 IST

राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अजब कारभार सुरू आहे. अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक)

एक लाख वाहनधारक त्रस्त : करार संपूनही परिवहन विभागाचे दुर्लक्षसुमेध वाघमारे - नागपूर राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अजब कारभार सुरू आहे. अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून दिले जात आहे. विशेष म्हणजे, आरसीबुक आॅप्टिकल स्मार्ट कार्ड स्वरूपात तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या खासगी कंपनी ‘शाँग’शी करार संपला. सहा महिन्यांसाठी दिलेली मुदतवाढही संपली. परंतु या मुदतीत परिवहन विभाग हातावर हात ठेवून बसल्याने याचा फटका आता वाहनधारकांना बसत आहे. राज्यभरात एक लाख वाहनधारक आरसीच्या प्रतीक्षेत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.परिवहन विभागाकडून २००६ मध्ये शाँग या कंपनीला आरसी बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात तयार करून देण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यापूर्वी नवीन नोंदणी झालेल्या वाहनांना आरटीओ कार्यालयातर्फे आरसी बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात दिले जात होते. मात्र ते सांभाळणे खूप जिकिरीचे होते. तंत्रज्ञानातील बदल ओळखून परिवहन विभागाने ‘शाँग’ या खासगी कंपनीला स्मार्टकार्ड बनविण्याचे कंत्राट दिले. जून २०१४ मध्ये हे कंत्राट संपले. या कंत्राटदाराला दिलेली सहा महिन्यांची मुदतवाढही नोव्हेंबरअखेरीस संपली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या तारखेपासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक दिले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, देण्यात येणाऱ्या या कागदी आरसीबुकला पुन्हा स्मार्टकार्ड स्वरूपातील आरसी बुक बनवून घेण्यासाठी वाहनधारकांना आरटीओचे खेटे मारावे लागणार आहे. ‘शाँग’ कंपनीशी करार संपून व याला सहा महिन्यांची मुदतवाढ देऊनही या काळात परिवहन विभागाने काहीच हालचाली केल्या नसल्याने या विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. ही परिस्थिती राज्यभरात आहे. परिणामी राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणीधारकांमध्ये संताप आहे. यातच दिवसाकाठी ५० वर नव्या वाहनांची नोंद होत असताना आज २० ते ३० आरसी बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात तयार होत असल्याने राज्यभरात एक लाख आरसी प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)नागपूर आरटीओत चार हजार आरसी प्रलंबितप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व मिळून मागील १५ दिवसांत सुमारे चार हजार आरसी प्रलंबित आहे. पूर्वी हे काम ‘शाँग’ कंपनीच्या १५ वर कर्मचाऱ्यांवर होते, ते आता आरटीओ कार्यालयाच्या दोन-तीन कर्मचाऱ्यांवर आले आहे. यामुळे जिथे १०० वर आरसी बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात तयार व्हायचे तिथे दिवसाकाठी २० वर कागदी आरसी बुक तयार होत नसल्याने दिवसेंदिवस प्रलंबित आरसीची संख्या वाढत आहे.