विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 06:24 AM2024-05-25T06:24:31+5:302024-05-25T06:25:23+5:30

विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी पुढे ढकललेला निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला.

Voting for four Legislative Council seats on June 26 | विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान

विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी पुढे ढकललेला निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार असून,  मतमोजणी १ जुलै रोजी होणार आहे. विलास पोतनीस, निरंजन डावखरे,  कपिल पाटील व किशोर दराडे ७ जुलै रोजी निवृत्त होतील.

असा आहे कार्यक्रम 
अधिसूचना : ३१ मे २०२४
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : ७ जून 
अर्जांची छाननी : १० जून २०२४ 
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : १२ जून २०२४ 
मतदान : २६ जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत 
मतमोजणी : १ जुलै २०२४ 

Web Title: Voting for four Legislative Council seats on June 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.