शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

Vote for LMOTY 2019: 'या' पंचकन्यांपैकी रंगभूमीवर कुणी भरले रंग?; कुणाच्या अभिनयाने झालात दंग? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 7:22 PM

अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

Vote for lokmat maharashtrian of the year 2019 nominations for best female actor theatre category

ज्यांच्या मनगटांत महाराष्ट्र आणि मुठीत विश्व अशा महारत्नांचा गौरव म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळा. यंदा २० फेब्रुवारीला मुंबईत हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय, सिनेमा, रंगभूमी या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे. त्यातील रंगभूमी-स्त्री या गटासाठी पाच नामांकनं निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी तुमच्या आवडत्या अभिनेत्रीला तुम्ही खालील बॉक्समध्ये मत देऊ शकता.  

गौरी इंगवले - ओवी बालकलाकार गौरी इंगवले हिने २०१२ साली चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. नुकतेच तिने ओवी या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. २०१७ साली सादर झालेली ओवी ही एकांकिका आता दोन अंकी नाटकात रंगभूमीवर दाखल झाली आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अश्वमी थिएटर्सने या नाटकाची निर्मिती केली असून बाल अभिनेत्री गौरी इंगवले आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. 

हेमांगी कवी - ओवीहेमांगी कवीने नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. २०१७ साली सादर झालेली ओवी ही एकांकिका आता दोन अंकी नाटकात रंगभूमीवर दाखल झाली आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अश्वमी थिएटर्सने या नाटकाची निर्मिती केली असून बाल अभिनेत्री गौरी इंगवले आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत. हेमांगीने आश्रम शाळेतील समिधा ताईची भूमिका रंगवली आहे. ओवी पाहिल्यानंतर रहस्यमय थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. 

कविता लाड - एका लग्नाची पुढची गोष्टप्रशांत दामले आणि कविता लाड यांची मुख्य भूमिका असलेले एका लग्नाची गोष्ट हे नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकाचा पुढचा भाग म्हणजेच एका लग्नाची पुढची गोष्ट नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर पती-पत्नीचे नाते कशा पद्धतीने बदलत जाते, त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदाºयांमुळे त्यांचे नाते कसे बदलते हे सगळे हलक्या फुलक्या पद्धतीने या नाटकात मांडण्यात आलेले आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकरने केले असून यात कविता लाड यांनी मनिषा ही व्यक्तिरेखा साकारली असून या भूमिकेनं गृहिणीच्या मनाचा ठाव घेतला आहे. 

मयुरी देशमुख -डियर आजो २०१८ मध्ये मयुरी लिखित व अभिनीत डिअर आजो हे नाटक रंगभूमीवर दाखल झाले. या नाटकात मयुरीने शानूची भूमिका साकारली आहे. या तरुण लेखिकेने लिहिलेले हे पहिलेच नाटक असून हे नाटक तिने अवघ्या बावीसाव्या वर्षी लिहिले आहे. मुळात या वयात इतक्या प्रगल्भ विषयावर एक अख्खे दोन अंकी व्यावसायिक नाटक तिने लिहिले याबद्दल मयुरीचे कौतुक आहे. मयुरी आजच्या तरुण पिढीतली आहे आणि त्यामुळे तिने आजच्या पिढीच्या साहित्याचा बाज या नाटकात वापरला आहे. डियर आजो अत्यंत हलकंफुलकं आणि मनोरंजक असले तरीही भावनिक ठेवण्यात यश मिळवले आहे. नातं म्हणजे काय दुधावरची साय असे कॅप्शन असलेले हे डियर आजो नाटक म्हणजे एका ओघाने एकट्या पडलेल्या आजोबाची आणि अचानक एकटी पडलेल्या नातीच्या नात्याची गोष्ट आहे.

तेजश्री प्रधान -तिला काही सांगायचंय तेजश्री प्रधान चे तिला काही सांगायचंय हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. या नाटकात तिने मितालीची भूमिका बजावत असून तिच्यासोबत आस्ताद काळे मुख्य भूमिकेत आहे. 'एक बंडखोर नाटक' अशी या नाटकाची टॅगलाइन असून नवरा बायकोमध्ये हाताळले जाणारे विषय या नाटकातून कोणताही संकोच न बाळगता स्पष्टपणे मांडले आहेत. मिताली सहस्त्रबुद्धे आणि यश पटवर्धन हे दोघे पती-पत्नी आहेत. यश कापोर्रेट क्षेत्रात वावरत आहे तर मिताली ही स्त्रीवादी संघटनेशी संबंधित आहे. 

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Hemangi Kaviहेमांगी कवीKavita Laadकविता लाडTejashree Pradhanतेजश्री प्रधान