शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

विठू माझा बहुजनी जाहला; पंढरीत इतिहास घडला!

By admin | Updated: August 2, 2014 03:20 IST

एकेकाळी अस्पृश्यांना प्रवेशास मज्जाव असलेल्या पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बहुजन समाजाच्या पुजा-यांनी पूजा करून इतिहास घडवला.

पंढरपूर : एकेकाळी अस्पृश्यांना प्रवेशास मज्जाव असलेल्या पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बहुजन समाजाच्या पुजाऱ्यांनी पूजा करून इतिहास घडवला. विशेष म्हणजे रुक्मिणीमातेचा पोशाख करण्यापासून ते शास्त्रोक्त मंत्रपठण करण्याची जबाबदारी प्रथमच दोन महिला पुजाऱ्यांनी पार पाडली. सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारी २०१४ रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे-उत्पातांची मक्तेदारी संपुष्टात आणली होती. त्याबरहुकूम मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांच्या सूचनेनुसार बडवे-उत्पातांना हटवून पूजाविधीसाठी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. शास्त्रोक्त पूजा करण्यास यात पारंगत उमेदवारांची निवड करण्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने पुजाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी राज्य-परराज्यांतून १९० अर्ज आले होते. यात २३ महिलांचा सहभाग होता, तर प्रत्यक्ष मुलाखतीला चौघींनीच हजेरी लावली आणि त्यातील ऊर्मिला अविनाश भाटे व हेमा नंदकुमार आष्टेकर यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त दोन महिलांसह १० पुजाऱ्यांनी शुक्रवारी मंदिरात पूजा व विधी सुरू केला. नवनियुक्त पुजाऱ्यांमध्ये नामदेव महाराजांचे सतरावे वंशज केदार कृष्णदास नामदास यांचा समावेश आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या निर्णयाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उत्साह द्विगुणित झाला असल्याचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले.