शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जीत गणेश मूर्ती डम्पींग ग्राऊंडवर!

By admin | Updated: October 1, 2015 01:10 IST

खामगाव नगरपालिकेचा फिरत्या विसर्जन कुंडाचा उपक्रम वादात, मूर्तींची विटंबना, नगराध्यक्ष आणि मुख्याधिका-यांवर गुन्हा दाखल.

खामगाव (बुलडाणा): पर्यावरणपूरक गणेशाचे विसर्जन करण्याची साद घालून विसर्जनासाठी आलेल्या गणेश मूर्ती डम्पींग ग्राऊंडवर कचर्‍यात टाकण्यात आल्याच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी ओमप्रकाश शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री यासंदर्भात पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खामगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी फिरते जलकुंड तयार करुन त्यामध्ये गणेश विसर्जन करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फिरत्या जलकुंडामध्ये गणेश विसर्जन करण्यात आले; मात्र ३0 सप्टेंबर रोजी डम्पींग ग्राऊंड (कचरा साठविण्याचे मैदान) परिसरात गेलो असता, त्याठिकाणी गणेश मूर्ती कचर्‍यात आढळून आल्या, असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. हा प्रकार कुणाला समजू नये, यासाठी गणेश मूर्तीवरुन वाहन फिरविण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. धार्मिक पध्दतीने गणेश विसर्जन करण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नसताना, शासनाचा निधी व यंत्रणेचा दुरुपयोग करून नागरिकांचा विश्‍वासभंग केला असल्याचा आरोपही तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी, तसेच नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा आणि इतरांविरुध्द कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलीस स्टेशनमध्ये गर्दी

ओमप्रकाश शर्मा यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत बांगर या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. कारवाई करण्याच्या मागणीसाठी ओमप्रकाश शर्मा यांच्यासह त्यांचे सर्मथक मोठय़ा संख्येने पोलिस स्टेशनसमोर जमा झाले होते. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डी.ई.नामवाड यांनीसुध्दा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन याप्रकरणी आपली बाजु मांडली. या तक्रारीच्या अनुषंगाने कायदेशीर बाबी तपासण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.