शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर काँग्रेस नगरसेवकांना धमकावले, पोलीस चौकशी सुरू; विजय वडेट्टीवार म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:53 IST

Congress Vijay Wadettiwar: समृद्धी महामार्गावर घडलेल्या प्रकरणी कोण होते, कोणी हल्ला केला, याबाबत अधिक माहिती नाही, पण पोलीस तपास करत आहेत.

Congress Vijay Wadettiwar: समृद्धी महामार्गावर काँग्रेसच्या नगरसेवकाची बस थांबवून त्यांना धमकावण्यात आले, हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी चाकू,तलवार, बंदूक असल्याची माहिती मिळाली पोलिस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी दिली.

समृद्धी महामार्गावर घडलेल्या प्रकरणी कोण होत, कोणी हल्ला केला याबाबत अधिकची माहिती नाही पण पोलिस याबाबत तपास करत असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. बारामती इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वडेट्टीवार यांनी वाहिली. या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे, लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे सीआयडी चौकशीपेक्षा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र यावेत का? त्या पक्षात कुणाला मंत्रिपद, उपमुख्यमंत्री पद द्यावे हा त्यांचा निर्णय आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वय पाहता मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र यावे अशी भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

ही सरकारची दुटप्पी भूमिका, पळवाटा शोधत आहेत

येत्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते पदाबाबत सरकार नवीन विधेयक आणणार आहे. या विधेयकाला वडेट्टीवार यांनी विरोध करत याची काय गरज आहे असा सवाल उपस्थित केला. राज्यात उपमुख्यमंत्री पद आहे जे संवैधानिक नाही पण विरोधी पक्ष नेते पद द्यायचे नाही म्हणून सरकार पळवाटा शोधत आहे. सरकारला हवे तसा कारभार करायचा आहे, विरोध नको म्हणून हे विधेयक आणले जात आहे, ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणूक आणि TET परीक्षेच्या तारखा एकच दिवशी आल्या आहेत. यामुळे शिक्षकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.राज्य सरकार आणि निवडणुकीत आयोगात समन्वय नाहीये का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारला. शिक्षकांना असे वेठीस धरणे हा त्यांचा छळ आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress corporators threatened on Samruddhi highway; police investigation underway.

Web Summary : Congress leader Vijay Wadettiwar alleges corporators were threatened on Samruddhi highway, police investigating. He demands judicial inquiry into plane crash, criticizes government's stance on opposition leader's post, and addresses TET exam date clash.
टॅग्स :congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Corporationनगर पालिकाChandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६