“BJP वाल्यांनी शुद्धीत राहून बोलावं, राज्य सरकार केंद्राच्या सूचनेनुसार काम करतंय”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 04:08 PM2021-08-30T16:08:49+5:302021-08-30T16:11:00+5:30

भाजपच्या शंखनाद आंदोलनावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार टीका केली आहे.

vijay wadettiwar criticised bjp over agitation to reopen temples | “BJP वाल्यांनी शुद्धीत राहून बोलावं, राज्य सरकार केंद्राच्या सूचनेनुसार काम करतंय”

“BJP वाल्यांनी शुद्धीत राहून बोलावं, राज्य सरकार केंद्राच्या सूचनेनुसार काम करतंय”

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणेच राज्य सरकार काम करत आहेभाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी शुद्धीवर असल्यासारखी वक्तव्ये करावीभाजपचा शंखनाद राज्य सरकारच्या नसून केंद्र सरकारच्या विरोधात असावा

मुंबई: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार भाविकांसाठी मंदिरे खुली करत नसल्याबाबत भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भाजपची राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलने सुरू आहेत. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शने सुरू असून, काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोधाला झुगारून थेट मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला आहे. भाजपच्या शंखनाद आंदोलनावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार टीका केली असून, BJP वाल्यांनी शुद्धीत राहून बोलावे, राज्य सरकार केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार काम करत आहे, असा टोलाही लगावला आहे. (vijay wadettiwar criticised bjp over agitation to reopen temples)

“शिवसेनेची टीम लूटमार करतेय, ही आहे ठाकरे सरकारची ‘महान’ ११”; भाजपचे टीकास्त्र

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात पुण्यात कसबा गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करत चंद्रकांत पाटील यांनी नियम मोडून मंदिरात शिरण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. पंढरपुरात भाजपकडून जोरदार आंदोलन केले असून कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीजवळील भिंत ओलांडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. नागपूर आणि औरंगाबादमध्येही भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू असून, मंदिरे खुली करण्याच्या मागणीवर कार्यकर्ते ठाम आहेत. ठिकठिकाणी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने केली जात आहेत. यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिले. 

“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

राज्य सरकार केंद्राच्या सूचनेनुसार काम करतेय

केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणेच राज्य सरकार काम करत आहे. त्यामुळं भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी शुद्धीवर असल्यासारखी वक्तव्ये करावी आणि विचार करून भूमिका घ्यावी. भाजपचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकात काय सुरू आहे? तिथे कुठे मंदिरे उघडी आहेत? तिथे दारूची दुकाने सुरू नाहीत का? त्यामुळे भाजपच्या लोकांनी शुद्धीवर असल्यासारखे बोलावे. बेधुंद असल्यासारखे बोलू नये, असा पलटवार विजय वडेट्टीवार यांनी केला. 

“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

केंद्र सरकारकडून निर्बंधांच्या सूचना

मंदिरे उघडण्याचा विषयच नाही. केंद्र सरकारने निर्बंधांच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसारच राज्य सरकार पावले टाकत आहे. केंद्र सरकारच्या सूचना फक्त राज्यासाठी नाहीत, संपूर्ण देशासाठी आहेत. केरळमध्ये अवघ्या चार दिवसांत पुन्हा १ लाखांहून अधिक नवे करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे भूमिका घेताना केवळ सरकारला विरोध म्हणून न बोलता भाजपवाल्यांनी लोकांचा विचार करावा, असा टोला लगावत धार्मिक भावना भडकवून मत मिळवणे एवढेच भाजपचे काम आहे. खरे तर भाजपवाल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घालायला हवे. त्यांचा हा शंखनाद राज्य सरकारच्या नसून केंद्र सरकारच्या विरोधात असावा, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. ते 'टीव्ही ९'शी बोलत होते. 

“असं कधीच पाहिलं नाही; आमचेच नेते आणि मंत्र्यांना टार्गेट केलं जातंय”; सुप्रिया सुळेंची टीका

दरम्यान, राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे. त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर तातडीने केंद्राकडून अपेक्षित लसमात्रा राज्यांना पुरवल्या जातील, असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्यांना सांगितले होते. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे व सणासुदींच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळली पाहिजे, असेही केंद्र सरकारने राज्यांना स्पष्ट केले होते.
 

Web Title: vijay wadettiwar criticised bjp over agitation to reopen temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.