शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

वायुबाधेच्या घटनास्थळाची पाहणी

By admin | Updated: December 1, 2014 02:10 IST

शहरात वायुबाधेच्या अफवेने नागरिकांत भीतीचे वातावरण असून आ. ज्योती कलानी यांनी ओटी सेक्शन ते मध्यवर्ती पोलीस ठाणेदरम्यान शांती मोर्चा काढून पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले.

उल्हासनगर : शहरात वायुबाधेच्या अफवेने नागरिकांत भीतीचे वातावरण असून आ. ज्योती कलानी यांनी ओटी सेक्शन ते मध्यवर्ती पोलीस ठाणेदरम्यान शांती मोर्चा काढून पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले. ओटी सेक्शन विभागातील दुकाने बंद ठेवण्यात आली असून, वायुबाधितांनी साडेपाचशेचा आकडा गाठला आहे. अपर जिल्हाधिकारी अशोक सिंगारे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेऊन घटनेची माहिती घेतली आहे. वालधुनी नदीपात्रात टँकरद्वारे घातक रासायनिक द्रव सोडल्याने नदीकिनाऱ्याच्या नागरिकांना त्रास झाल्याने शहरात खळबळ उडून हाहाकार उडाला होता. वायुबाधित नागरिकांवर वेळीच उपचार झाल्याने जीवितहानी टळली. टँकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यवर्ती रुग्णालयात रविवारी सकाळी ११पर्यंत ५२७ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली.वायुबाधितांसाठी एक कक्षच तयार केल्याची माहिती डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली. या वेळी पालिकेचे उपायुक्त देवीदास पवार, उपविभागीय अधिकारी बी.जी. गावडे, तहसीलदार, पोलीस अधिकारी, प्रदूषण मंडळाने नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती उप प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे व मनोहर वाकळे यांनी दिली. वायुबाधेच्या निषेधार्थ ओटी सेक्शन परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली. अद्यापही उग्र दर्प येत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संस्थाप्रमुख महादेव सोनावणे यांनी घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.