VIDEO: माझ्या मनात पाप नव्हतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट हल्ला, दुसरा टिझर प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 11:33 IST2022-07-25T11:32:00+5:302022-07-25T11:33:27+5:30

हम दो एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाये असा टोला उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या प्रश्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

VIDEO: Uddhav Thackeray Direct attack on Eknath Shinde, BJP, second teaser of interview released | VIDEO: माझ्या मनात पाप नव्हतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट हल्ला, दुसरा टिझर प्रसिद्ध

VIDEO: माझ्या मनात पाप नव्हतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट हल्ला, दुसरा टिझर प्रसिद्ध

मुंबई - मला एका गोष्टीचं समाधान आहे. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो परंतु मला सत्तेची चटक लागली नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माझ्या मनात काही पाप नव्हतं. मी मुख्यमंत्री होईन असं मी बोललो नव्हतो. वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी दुकानदारी बंद करून बसेन? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. 

सामना संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा टीझर प्रसिद्ध केला आहे. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. उद्धव ठाकरे स्वत: सुरतला गेले असते तर..? फुटीर लोकांनी विनंती केली आम्हाला गद्दार म्हणू नका. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असता का? तुमची मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती? फुटीरांचा आक्षेप हाच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले? मुंबईचा घात करणारी योजना आपल्याला दिसतेय का? असे रोखठोक प्रश्न राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारले. 

हम दो एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाये असा टोला उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या प्रश्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. माझ्या मनात काही पाप नव्हतं. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो परंतु सत्तेची चटक लागली नाही या एका गोष्टीचं माझ्या मनात समाधान आहे. मी मुख्यमंत्री होईन असं बोललो नव्हतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या बहुचर्चित मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा एक फोटो ट्विट करुन याची माहिती दिली होती. आता मुलाखतीचा टिझर प्रदर्शित करुन उद्धव ठाकरे यांच्या 'जोरदार' मुलाखतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या टिझरमध्ये उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडींवरील प्रश्नांना थेटपणे उत्तरं देताना दिसत आहेत. पहिल्या टिझरनंतर आता दुसरा टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी बेधडक सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

पहिल्या टिझरमध्ये काय होतं?
मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आणि पक्षात फूट पडली यात नेमकं काय चुकलं? महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारल्याचं टिझरमध्ये दिसून येत आहे. यात अखेरीस उद्धव ठाकरे यांनी "आता पुन्हा एकदा सामान्यांना सामान्यातून असामान्य लोक घडविण्याची वेळ आली आहे", असं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं आता शुन्यातून सुरुवात करण्याची आणि सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाण्याची तयारी सुरू केली असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं आहे.

Web Title: VIDEO: Uddhav Thackeray Direct attack on Eknath Shinde, BJP, second teaser of interview released