शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : 'जलयुक्त शिवार’ मधून २३ हजार हेक्टरवर संरक्षित ओलित !

By admin | Updated: October 20, 2016 13:10 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांमधून सप्टेंबर अखेरपर्यंत १६ हजार ३३९ घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा निर्माण झाला आहे

संतोष येलकर, ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. २० -  जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांमधून सप्टेंबर अखेरपर्यंत १६ हजार ३३९ घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा निर्माण झाला आहे. निर्माण झालेल्या या पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात २3 हजार हेक्टर शेतीच्या संरक्षित ओलितासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांचा यावर्षी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत गत दोन वर्षांपासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यात गत सप्टेंबर अखेरपर्यंत ६ हजार २३० ‘जलयुक्त शिवार’ची कामे करण्यात आली. त्यामध्ये सिमेंट नाला बांध, नदी-नाल्यांचे खोलीकरण-रुंदीकरण, तलावातील गाळ काढणे, नद्यांचे पुनरुज्जीवन व इतर कामांचा समावेश आहे. लोकसहभाग आणि विविध यंत्रणांमार्फत जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करण्यात आली. यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने, जिल्ह्यात करण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामातून सप्टेंबर अखेरपर्यंत १६ हजार ३३९.८२ घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. या पाणी साठ्याचा २२ हजार ९९९ हेक्टर ३ आर शेतीच्या एक संरक्षित ओलितासाठी आणि १२ हजार ६८० हेक्टर २८ आर शेतीच्या दोन संरक्षित ओलितासाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांद्वारे यावर्षी निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना करता येणार आहे.पूर्ण करण्यात आलेली कामे!

जिल्ह्यात जलयुक्त अभियान अंतर्गत जिल्ह्यात ६ हजार २३० कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यात ९१३, आकोट ७२७, बार्शीटाकळी ६५४ ,बाळापूर ७४५, तेल्हारा ११२८, पातूर १५०८ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ५५५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.‘या’ कामातून निर्माण झाला पाणीसाठा !जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात शेततळे, ढाळीचे बांध, सिमेंट बांध, सिंचन विहिरी, नाला बांध, शिवकालीन तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव दुरुस्ती इत्यादी कामे करण्यात आली. या कामांमुळे जिल्ह्यात पाणीसाठा निर्माण झाला आहे.जिल्ह्यात अशी उपलब्ध झाली संरक्षित सिंचन क्षमता ! (हेक्टर)तालुका एक संरक्षित सिंचन केल्यास दोन संरक्षित सिंचन केल्यासअकोला :  ३५८० . ८४ २०२३.०१आकोट : ३४५३. ०७ १९०५.०१बार्शीटाकळी : ३३४६. ७५ १७७८.००बाळापूर  : १४१२ . ७१ ८४५.५९पातूर   : ५०७८ . ०१ २६८९.४८तेल्हारा : ४०२४ . ७४ २३०९. ००मूर्तिजापूर : २१०२ . २८ ११३०.०१एकूण : २२९९९ . ०३ १२६८०.२८