शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का
4
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
5
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
6
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
7
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
8
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
9
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
10
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
11
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
12
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
13
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
14
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
15
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
16
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
17
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
18
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
19
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
20
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)

आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 06:07 IST

Jitendra Awhad- Gopichand Padalkar row:

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. याचे पडसाद शुक्रवारी पहाटेपर्यंत उमटत होते. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तर उलट पोलिसांनी आव्हाड यांच्या मार खाल्लेल्या कार्यकर्त्यालाच ताब्यात घेतल्याचा प्रकार घडल्याने आव्हाड यांनी रात्रभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता. 

जितेंद्र आव्हाड यांच्यानुसार, पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले. शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडले आहे.आणि विधानसभा सचिवांनी  माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे. म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता, पळून जाणार पडळकरचे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

तसेच सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..!मी इतकच सांगतो, माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही, अशी पोस्ट आव्हाड यांनी एक्सवर केली आहे. तसेच पोलिसांच्या वाहनासमोर बसत आंदोलन करत असल्याचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. 

विधानभवनात काय घडले...विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकत्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. तर तिथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि इतरांनी मध्ये पडून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना दूर केले.

मारहाणीचा व्हिडीओ...

काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात गोपिचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर काल गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड आमने सामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिविगाळ करून धमकावण्यात आले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडल्याने या वादाने गंभीर वळण घेतलं आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडvidhan sabhaविधानसभाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिस