व्हिडिओ: वंशाच्या दिव्यासाठी पतीची पत्नीला बेदम मारहाण

By Admin | Updated: June 29, 2016 16:26 IST2016-06-29T16:23:41+5:302016-06-29T16:26:56+5:30

मुलगा हवा असतानाही एकापाठोपाठ एक मुलीच झाल्याने एका इसमाने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुसद तालुक्यात घडली.

Video: Husband's wife suffers fierce battles for family lighting | व्हिडिओ: वंशाच्या दिव्यासाठी पतीची पत्नीला बेदम मारहाण

व्हिडिओ: वंशाच्या दिव्यासाठी पतीची पत्नीला बेदम मारहाण

ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. २९ - पाठोपाठ चारही मुलीच झाल्याने वंशाच्या दिव्यासाठी पत्नीला बेदम मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना महागाव तालुक्यातील वडद येथे घडली. याप्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी पतीसह सासू-सास-यांना ताब्यात घेतले. 
 
ज्ञानेश्वर मदन राठोड (३०) रा. वडद, ता. महागाव, सासरा मदन राठोड (६०), सासू जनाबाई मदन राठोड अशी आरोपींची नावे आहेत. कविता ज्ञानेश्वर राठोड (२७) हिला चार मुलीच आहेत. वंशाला दिवा नाही म्हणून तिला सासरची मंडळी त्रास देत होती. २४ जून रोजी कविताला बेदम मारहाण करून पतीने घराबाहेर हाकलून दिले. याप्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी पती, सासू व सास-याविरुद्ध २४ जून रोजीच गुन्हा दाखल केला. दरम्यान आज या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपास ठाणेदार धनंजय जगदाळे करीत आहे.
 
 

Web Title: Video: Husband's wife suffers fierce battles for family lighting