शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- पुलाअभावी थर्माकॉलवरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: August 28, 2016 16:59 IST

पाटोदा तालुक्यातील कुसळंब परिसरातील वाड्यावस्त्यांलगत असलेल्या तलावात पाणी साठल्याने नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 28 - पाटोदा तालुक्यातील कुसळंब परिसरातील वाड्यावस्त्यांलगत असलेल्या तलावात पाणी साठल्याने नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड झाले आहे. पुलाअभावी नागरिकांना चक्क चप्पूचा आधार घ्यावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही स्थिती निर्माण होत असताना पूल बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे.कुसळंबपासून हाकेच्या अंतरावर  असलेल्या लांबरवाडी परिसरात वाड्यावस्त्या स्थिरावलेल्या आहेत. कृष्णा खोऱ्यांतर्गत मोठा साठवण तलाव झाल्याने वाड्यावस्त्यांच्या चोहोबाजूने पाणी साठत आहे. त्यामुळे वस्ती आणि गावाचा संपर्क तुटला असून, ग्रामस्थांना चप्पूवर थर्माकॉल अंथरून प्रवास करावा लागत आहे. एवढेच नाही तर शेळ्या, लहान-लहान जनावरे, किराणा सामान, चारा आदी वस्तूंचेही यावरूनच ने-आण केली जाते. तलावाच्या दोन्ही टोकांना दोरखंड बांधला असून, त्याआधारे विद्यार्थी शाळेत मार्गस्थ होत आहेत.नागझरी वस्ती, मालेवस्ती, केकाणवस्ती, आजबेवस्ती, खिळेवाडीवस्ती, वाल्हेकरवस्ती येथील ग्रामस्थांना हे रोजचे काम झाले आहे. दोन वर्षांपूर्वीही अशीच अवस्था असताना शेतातून चारा घेऊन येत असताना दोन महिला पाण्यात बुडल्या होत्या. त्यापैकी अनिता देविदास लांबरूड यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर शोभा आप्पासाहेब लांबरूड यांना ग्रामस्थांमुळे जीवदान मिळाले होते. संपूर्ण वस्त्यांना तलावाचे पाण्याने वेढले असल्याने नागरिकांना रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनाही अशीच कसरत करून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. पूल उभारण्याची मागणी वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांनी केली आहे.तलावामुळे पाणीसाठा आहे, मात्र पूल नसल्याने जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना रोजचा प्रवास करावा लागत आहे. यासंबंधी प्रशासनाला वेळोवेळी कळवून देखील दुर्लक्ष झालेले आहे. लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. पूल बांधून ग्रामस्थांची व्यवस्था करावी.