विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, प्रवासी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 08:30 IST2018-06-18T08:30:30+5:302018-06-18T08:30:30+5:30

विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विदर्भ एक्स्प्रेस नागपूरकडे जात असताना अकोल्यातील कुरुम स्थानकात हा तांत्रिक बिघाड झाला.

Vidarbha Express's engine fails, passengers suffer | विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, प्रवासी त्रस्त

विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, प्रवासी त्रस्त

अकोला : विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विदर्भ एक्स्प्रेस नागपूरकडे जात असताना अकोल्यातील कुरुम स्थानकात हा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे दोन तासांपासून विदर्भ एक्स्प्रेस कुरुम स्थानकात थांबवली आहे. यामुळे इतर रेल्वे गाड्यांचे नियोजन विस्कळीत झाले असून प्रवासी सुद्धा त्रस्त झाले आहेत. 

सोमवारी सकाळी अकोल्याहून नागपूरच्या दिशेने विदर्भ एक्स्प्रेस जात होती. यावेळी कुरुम स्थानकात एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे प्रवासी व रेल्वे प्रशासन, कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. गेल्या दोन तासांपासून विदर्भ एक्स्प्रेस कुरुम स्थानकात थांबवली आहे. त्यामुळे  इतर रेल्वे गाड्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, घटनास्थळी रेल्वे प्रशासन दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरु आहे. तसेच, या मार्गावरील वाहतूक लवकरच पूर्व पदावर येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 

Web Title: Vidarbha Express's engine fails, passengers suffer