डॉक्टरांच्या संपाने घेतला तरूणाचा बळी

By Admin | Updated: July 6, 2014 00:31 IST2014-07-06T00:31:45+5:302014-07-06T00:31:45+5:30

उपचाराअभावी 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली़ नरेश माधवराव सोनवणो(35) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आह़े

A victim of youth took the doctor's right | डॉक्टरांच्या संपाने घेतला तरूणाचा बळी

डॉक्टरांच्या संपाने घेतला तरूणाचा बळी

जळगाव : उपचाराअभावी 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली़ नरेश माधवराव सोनवणो(35) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आह़े जिल्हा रुग्णालयात वेळेवर उपचार न झाल्यामुळे सोनवणो यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप  संतोष व रवींद्र सोनवणो यांनी केला आह़े डॉक्टरांच्या संपाचे कारण सांगून रुग्णालयातील कर्मचारी त्याला दाखल करून घेण्यास तयार नव्हत़े 
घराच्या पहिल्या मजल्यावर  दात घासत असताना  शनिवारी सकाळी 6़3क् वाजेच्या सुमारास तोल जाऊन खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता  सुरुवातीला रुग्णालयातील कर्मचा:यांनी त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला़ नातेवाईक संतप्त झाल्यानंतर त्याला दाखल करून घेण्यात आल़े मात्र उपचारादरम्यान सकाळी 11़3क् वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)

 

Web Title: A victim of youth took the doctor's right