ज्येष्ठ प्राणीप्रेमी लिलाताई परुळेकर यांचे निधन

By Admin | Updated: September 13, 2016 12:48 IST2016-09-13T12:48:07+5:302016-09-13T12:48:07+5:30

ज्येष्ठ प्राणीप्रेमी लिलाताई परुळेकर (वय ८१) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले़

Veteran lover Lailatai Parulekar passes away | ज्येष्ठ प्राणीप्रेमी लिलाताई परुळेकर यांचे निधन

ज्येष्ठ प्राणीप्रेमी लिलाताई परुळेकर यांचे निधन

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १३ -  ज्येष्ठ प्राणीप्रेमी लिलाताई परुळेकर (वय ८१) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले़ 
लिलाताई यांच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते़. सकाळ चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांच्या त्या कन्या होत़
त्यांच्यामागे कोणीही नसल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची देखभाल एक ट्रस्टमार्फत केली जात होती़ 
त्यांना प्राण्यांची खूप आवड होती़ त्यांनी सुमारे ५०० भटक्या कुत्र्यांची देखभाल त्यांच्या कोरेगाव पार्क येथील बंगल्यामध्ये केली होती़ सध्या त्या ठिकाणी सुमारे १५० कुत्रे आहेत़
या प्राणीप्रेमामुळेच त्यांना महावीर जैन पुरस्कार तसेच विवेक मेनन अ‍ॅनिमल अलाईव्ह पुरस्कार देण्यात आला होता़ पुण्यातील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ 

Web Title: Veteran lover Lailatai Parulekar passes away