शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: सर्व खासगी रुग्णालयांत मिळणार लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 06:22 IST

Corona Vaccination: केंद्राच्या राज्यांना सूचना. मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत देशातील १ कोटी ४८ लाख लोकांनाच कोरोनाची लस देण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकांना लवकरात लवकर कोरोनाची लस मिळावी आणि मोहिमेला वेग यावा, यासाठी सर्व खासगी रुग्णालयांमार्फत लसीकरण सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या. सध्याचा वेग अतिशय कमी असल्याने या सूचना केंद्राने दिल्या आहेत.


मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत देशातील १ कोटी ४८ लाख लोकांनाच कोरोनाची लस देण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षे वयावरील व्याधीग्रस्त यांना सोमवारीच लस देणे सुरू झाले आहे. त्यांची  संख्याही तब्बल २७ कोटी असून, त्यांच्यातील २ लाख ८ हजार जणांचेच लसीकरण  आतापर्यंत झाले आहे. 
या वेगाने देशातील १३५ कोटी जनतेला लस देण्यास कित्येक वर्षे लागू शकतील.  लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी  केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. 
मोहीम घेतली हाती
n खासगी रुग्णालयांमुळे लोकांना लवकर लस मिळू शकेल. या मोहिमेत खासगी रुग्णालये, दवाखाने, संस्था यांची मदत घ्यावी, असे आवाहन यापूर्वी अनेकांनी केलेच आहे.
n सध्या देशात १० हजार खासगी रुग्णालयांतच लस दिली जाते. पंतप्रधान जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांचाच सध्या लसीकरणासाठी समावेश आहे. याखेरीज काही हजार रुग्णालये ही लस देण्यासाठी तयार आहेत.

असे करण्याची दोन कारणे
आता सर्व खासगी रुग्णालयांत कोरोना लस देणे सुरू झाल्यास त्याचा वेग वाढेल आणि आताच्या टप्प्यातील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त यांचे लसीकरण लवकर पूर्ण होईल. 
कोरोनावरील लस वेळेत न वापरल्यास ती खराब होते आणि ती देता येत नाही. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे उत्पादन व पुरवठा वेगाने होत आहे. त्यामुळे ठरावीक मुदतीत त्या दोन्ही लसी वापरण्याचे बंधन आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांत ही लस देण्याचे ठरले असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस