‘मला फसविण्यासाठी परमबीर यांचा वापर’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 11:56 IST2023-05-18T11:56:37+5:302023-05-18T11:56:57+5:30
देशमुख म्हणाले, मला फसवण्याच्या बदल्यात परमबीर सिंह यांना बक्षीस म्हणून आमच्या सरकारने केलेले त्यांचे निलंबन शिंदे- फडणवीस सरकारने मागे घेतले आहे. याबाबत मी आमच्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बोललो आहे.

‘मला फसविण्यासाठी परमबीर यांचा वापर’
मुंबई : भाजपने मला फसविण्यासाठीच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा वापर केला होता, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
देशमुख म्हणाले, मला फसवण्याच्या बदल्यात परमबीर सिंह यांना बक्षीस म्हणून आमच्या सरकारने केलेले त्यांचे निलंबन शिंदे- फडणवीस सरकारने मागे घेतले आहे. याबाबत मी आमच्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बोललो आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व सरचिटणीस प्रवीण कुंटे-पाटील यांनी देशमुख यांना फसविण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर कोणत्या अदृश्य शक्तीने केला होता, हे आता समोर आले असल्याचे विधान केले.