शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना तूर्त अभय

By admin | Updated: June 22, 2014 02:16 IST

काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तूर्तास तरी अभय मिळाल्याचे संकेत आहेत.

दिल्लीत मंथन : सोनिया गांधींशी चव्हाण यांची भेट; उपाध्यक्ष परदेशातून आल्यावर अंतिम निर्णय
नबिन सिन्हा - नवी दिल्ली
गेल्या दोन दिवसांच्या वेगवान राजकीय घडामोडी आणि शनिवारी  काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तूर्तास तरी अभय मिळाल्याचे संकेत आहेत. मात्र काँग्रेस उपाध्यक्ष परदेशातून परत आल्यावर राज्यातील नेतृत्वबदलावर अंतिम निर्णय होईल, असे सूत्रंनी सांगितले.
महाराष्ट्रात नेतृत्वबदल होण्याची चर्चा, त्यासाठी पक्षश्रेष्ठींवर येत असलेला वाढता दबाव अणि आपल्या कार्यपद्धतीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षश्रेठींकडे व्यक्त केलेली कथित नाराजी या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री चव्हाण शुक्रवारी रात्री दिल्लीत आले होते. त्यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी कदाचित मुख्यमंत्री बदलले जातील, या चर्चेने दिल्लीतील वातावरण ढवळून निघाल़े चव्हाण यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली तेव्हा काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सल्लागार अहमद पटेलही हजर होते. पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, सोनिया गांधी यांना भेटण्याखेरीज आपण राज्यातील राजकीय स्थितीविषयी ए. के. अॅन्टनी, अहमद पटेल व गुलाम नबी अझाद यांच्याशी चर्चा केली, असेही त्यांनी सांगितले. नंतर त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग  यांचीही भेट घेतली. मात्र ही भेट नेमकी कशासाठी होती, हेही समजू शकले नाही.
राज्यात पक्षश्रेष्ठी केंद्रीय निरीक्षक पाठविणार आहेत का, असे विचारता चव्हाण यांनी स्पष्ट केले की, आपण आझाद व पटेल या दोघांकडेही हा विषय काढला, पण दोघांनीही असा काही विचार असल्याचा इन्कार केला. राज्यात कोणताही धोरण लकवा नाही व बहुतांश निर्णय ‘फास्ट ट्रॅक’वर टाकण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणो सांगितले. शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्दय़ांवर येत्या सोमवारी आघाडीच्या समन्वय समितीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितल़े पण सोनिया गांधींसह पक्षश्रेष्ठींशी झालेल्या चर्चेवर मला भाष्य करता येणार नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी परदेशातून परत आल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय होईल, असे सूत्रंनी सांगितले. शुक्रवारी रात्री चव्हाण यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते ए़ क़ेअॅन्टनी आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांची भेट घेतली होती़ चव्हाण यांच्यानंतर विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे हेही सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी पोहोचल़े सोनियांना भेटल्यानंतर मोघे यांनी अॅन्टनींची भेट घेतली़ यामुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या़ 
 अॅन्टनी आणि अहमद पटेल यांनी गत रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली होती़ त्यानंतर राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चेला वेग आला होता़ चव्हाणांच्या जागी संभाव्य मुख्यमंत्री म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव घेतले जात आहे.याशिवाय राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, नारायण राणो यांचीही नावे चर्चेत आहेत़ 
 
राज्यातील स्थितीविषयी चर्चा
सोनिया गांधी यांना भेटण्याखेरीज आपण राज्यातील स्थितीविषयी माजी संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टनी, अहमद पटेल व गुलाम नबी अझाद यांच्याशी चर्चा केली. सोनिया गांधी यांच्या भेटीत काय झाले हे मी उघड करणो उचित होणार नाही, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
 
अॅन्टनी समिती लागली कामाला
च्लोकसभा निवडणुकीतील न भूतो अशा पराभवाची मीमांसा करण्यासाठी काँग्रेसने नेमलेल्या ए. के. अॅन्टनी समितीने काम सुरू केले आहे. या समितीत पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विविध राज्यांमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते, प्रदेशाध्यक्ष व त्या त्या राज्याचे प्रभारी सरचिटणीस यांचा समावेश आहे. 
 
च्समितीने शनिवारी दिल्ली व हरियाणासंबंधी विचार केला. झारखंड, ओडिशा व छत्तीसगढवर रविवारी चर्चा होणार आहे. समितीने महाराष्ट्रातील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांना 28 जून रोजी दिल्लीत पाचारण केले आहे.