शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अर्बन बँका, पतसंस्थांतील कर्ज माफ होणार नाही!

By admin | Updated: June 27, 2017 02:37 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका आणि व्यापारी बँका यांच्याकडून घेतलेले कृषी कर्ज माफ करण्यात येणार आहे.

यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका आणि व्यापारी बँका यांच्याकडून घेतलेले कृषी कर्ज माफ करण्यात येणार आहे. तथापि, नागरी बँका आणि पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज माफ केले जाणार नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी या माहितीला दुजोरा दिला असून नागरी बँका आणि पतसंस्थांकडून कर्जमाफीबाबत आग्रही मागणी होत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सरकारने जाहीर केलेल्या दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निकषांबाबत उलटसुलट बातम्या येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले की, दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्याने वरची रक्कम भरली तरच त्याचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले जाईल. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे तीन लाखांचे कर्ज असेल तर त्याने दीड लाख रुपयांची परतफेड करताच त्याला दीड लाखांची कर्जमाफी दिली जाईल. पण ज्याच्याकडे आठ लाखाचे कर्ज असेल तर त्याने साडेसहा लाख रुपये भरले की त्याला दीड लाखाची कर्जमाफी मिळेल. दीड लाख रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज असलेले राज्यात ८ लाख शेतकरी आहेत. त्यांना कर्जमाफी द्यायची ठरली तर १२ हजार कोटी रुपये लागणार आहेत. शिवाय, राज्याच्या तिजोरीवर ३४ हजार कोटी रुपये नव्हे तर ४२ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.त्यामुळे दीड लाख रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकूण कर्जाच्या २५ टक्के कर्जमाफी द्यावी आणि ती महत्तम दीड लाख रुपये असावी, असे स्पष्ट मत सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात या बाबत उत्सुकता आहे.

निकष कसे ठरविण्यात आले?-चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. अन्य कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यास ही माफी दिली जाणार नाही. मात्र, त्यांच्या आईवडिलांच्या नावावर कर्ज असेल तर त्यांना कर्जमाफी दिली जाईल. कारण, कर्जमाफीचे निकष ठरविताना कुटुंब हा घटक मानण्यात आला आहे. कुटुंबाच्या शासकीय व्याख्येत पती-पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या १८ वर्षांखालील अपत्यांचा समावेश होतो. आईवडिलांचा समावेश होत नाही. मात्र, त्याचवेळी एखाद्या सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्याच्या शेतकरी १८ वर्षांवरील मुलाने वा मुलीने घेतलेले कृषी कर्ज मात्र निकषांनुसार माफ होईल, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. ती कर्जमाफी मिळणारच!३६ लाख शेतकऱ्यांवर दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आहे. ते सरसकट माफ करण्यात येणार आहे. त्यांचा सातबारा कोरा होईल. नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून दिली जाणार आहे. सरकारच्याच परिपत्रकामुळे दिले कृषी कर्ज-एकूण ठेवींच्या २० टक्के इतके कृषी कर्ज देण्याची अनुमती राज्य शासनानेच एका परिपत्रकाद्वारे पतसंस्थांना दिलेली आहे. त्या मर्यादेत ज्या पतसंस्थांनी कृषी कर्ज दिले आहे त्यांच्याकडील थकबाकीदार शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी द्यावी, अशी आमची माफक मागणी आहे. - काका कोयटे, अध्यक्ष, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन