शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

‘युजीसी’कडून संशोधन नियतकालिकांची सुधारित यादी प्रसिद्ध; : संशयास्पद ७१ नियतकालिके वगळली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 8:43 PM

भारतीय भाषांमधील आणि आंतरराष्ट्रीय अशा १९८ संशोधन नियतकालिकांचा त्यात नव्याने समावेश

ठळक मुद्देसेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स

पुणे : विद्यापीठे व महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचे संशोधनकार्य प्रसिद्ध करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) ' युजीसी केअर'अंतर्गत संशोधन नियतकालिकांची (रीसर्च जरनल्स) यादी दर तीन महिन्यांनी सुधारित केली जाते. काही नियतकालिके युजीसी केअरच्या निकषानुसार नसल्याने त्यांना वगळण्यात आले आहे. तर भारतीय भाषांमधील आणि आंतरराष्ट्रीय अशा १९८ संशोधन नियतकालिकांचा त्यात नव्याने समावेश करण्यात आला आहे. 

पूर्वी काही प्राध्यापकांकडून त्यांचे संशोधन प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या नियतकालिकांपैकी काही नियतकालिके अप्रमाणित पद्धतीने चालवली जात होती.तसेच त्यात काही गैरप्रकार होत होता. त्यामुळे संशोधनाचा दजार्ही सुमार हात चालला होता. या पार्श्वभूमीवर ' युजीसी केअर' अंतर्गत अशा नियतकालिकांची प्रथम सूची जून २०१९ मध्ये 'सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स' या केंद्राने केली. तसेच संशयास्पद ७१ नियतकालिके वगळली.

संशोधन नियतकालिकांच्या महत्वाच्या कामासाठी युजीसीने एक विशेष कक्ष प्रस्थापित केला असून त्याचे मुख्य कार्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केले आहे. या कामासाठी देशातील इतर चार विद्यापीठे व २५ राष्ट्रीय संस्था यांचे सहाय्य घेऊन दजेर्दार नियलकालिकांची यादी तयार केली जाते. ही यादी दर तीन महिन्यांनी सुधारित करून युजीसी केअर समितीची मान्यता घेऊन प्रसिद्ध केली जाते. यादीत सुधारणा करून १ एप्रिल २०२० रोजी सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती ह्यसेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्सह्ण  केंद्राच्या समन्वयक डॉ. शुभदा नगरकर यांनी दिली.दजेर्दार नियलकालिकांची यादी दोन गटात विभागलेली आहे. 'गट एक' मध्ये चार विद्यापीठे व इतर २५ संस्थांनी निर्देशित केलेली व केअर निकषानुसार मान्य झालेली  नियतकालिके  आहेत, तर 'गट दोन' मध्ये जगमान्य डेटाबेसमधील नियतकालिके यांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहितीसाठी  ugc.journalcell@gmail.com  या ई-मेलवर सपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.-------------- 'गट एक' मध्ये सर्व भारतीय भाषांमधील दर्जेदार संशोधनात्मक नियतकालिके आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या तिमाहीमध्ये ३८ नियतकालिके नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यापैकी ८ इंग्रजी आहेत, इतर ३० भारतीय भाषांमधील आहेत.---------- 'गट दोन' मध्ये जगभरातील मान्यताप्राप्त अशा अमेरिकेतील मॉडर्न लँग्वेज असोसिएशन (एम.एल.ए.) या प्रसिद्ध डेटाबेसमधील १६० नियतकालिके नव्याने समाविष्ट करण्यातआली आहेत.तसेच  'गट दोन' मध्ये आधीच समाविष्ट असलेल्या जगभरातील दोन मान्यताप्राप्त डेटाबेसमधील (वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस) नियतकालिकांबद्दल यूजीसीकडे तक्रारी आल्या होत्या. त्यांची सर्वांगीण पडताळणी केल्यानंतर  स्कोपस या डेटाबेस मधील  अप्रमाणित  ७१ नियतकालिके आता या यादीतून वगळण्यात आली आहेत.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीGovernmentसरकार