शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील 300 गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य!

By admin | Updated: August 19, 2016 17:40 IST

जिल्ह्यातील २९७ गावांमध्ये दुषीत पाण्याचा पुरवठा होत असून या गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे

गणेश मापारी जि.बुलडाणा,दि. १९ : जिल्ह्यातील २९७ गावांमध्ये दुषीत पाण्याचा पुरवठा होत असून या गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. जिल्ह्यातील ९३२ पाणी नमुने जुलै महिन्यात तपासले असून यापैकी २९७ गावांमधील पाण्याचे नमुने दुषीत आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या पाणी पुरवठ्यापैकी ३२ टक्के दुषीत पाण्याचा पुरवठा केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पावसाळ्यात नदी-नाल्यांचे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या स्त्रोतामध्ये मिसळत असल्याने जलजन्य आजारात वाढ होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील पाण्याची प्रयोग शाळेत तपासणी केली जाते. जुलै महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तसेच जलाशयांची पातळी सुध्दा वाढली आहे. अनेक गावांमध्ये दुषीत पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे. आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आलेल्या पाण्यांच्या नमुन्यानुसार जिल्ह्यात ३२ टक्के दुषीत पाण्याचा पुरवठा केल्या जात असल्याचे समोर आले आहे.

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जुलै महिन्यात जिल्ह्यातील ९३२ गावांमधील पाणी नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी २९७ गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी संबधित ग्रामपंचायतींना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रत्येक गावातील जलसुरक्षकांना आता पाण्याच्या स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याची ग्रामपंचायतीच्या उपाययोजनेनंतर आणखी एकदा तपासणी केली जाणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत दुषीत पाण्याचा पुरवठा करण्यात येवू नये, असे निर्देश जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला दिले आहे.शेगाव तालुका अग्रस्थानीपिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध गावांमधील पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने प्रयोग शाळेत तपासले आहेत. शेगाव तालुक्यातून १८ पाणी नमुने तपासण्यात आले असून यापैकी १३ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याची बाब उजेडात आली आहे. त्यामुळे शेगाव तालुक्यात सर्वाधिक ७२ टक्के दुषीत पाणी पुरवठा केल्या जात असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन दिसून येत आहे.जुलैमध्ये वाढला दुषीत पाण्याचा पुरवठाजून महिन्यामध्ये जलाशयांची पातळी कमी होते. त्यामुळे पिण्यासाठी अनेक ठिकाणी दुषीत पाण्याचा वापर केला जातो. आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ६९४ पाणी नमुने तपासले. यापैकी २०४ गावांमध्ये दुषीत पाणी पुरवठा केल्या जात असल्याने संबंधित ग्रामंपचायतींना नोटीस देवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. ४तर जुलै महिन्यात दुषीत पाणी पुरवठा करणाऱ्या गावांमध्ये १०० गावे वाढली आहेत. जुलै महिन्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २९७ गावांमध्ये दुषीत पाणीपुरवठा केल्या जात आहे. ग्रामीण भागात नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. तर शहरी भागात नगर परिषदांनी पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यास योग्य असल्याबाबत शहानिशा करणे गरजेचे आहे. जुलै महिन्यात करण्यात आलेल्या तपासणी नुसार जिल्ह्यात ३२ टक्के पाणी पुरवठा दुषीत पाण्याचा होत आहे. हि गंभीर बाब असून पिण्यास योग्य अशा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाय योजना सुरु केल्या आहेत. -डॉ.व्ही.एम.डुकरे पाटील, वैद्यकीय अधिकारी साथरोग विभाग बुलडाणा