Union Home Minister Amit Shah arrives in Solapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात दाखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात दाखल

ठळक मुद्दे- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात दाखल- महाजनादेश यात्रेचा आज सोलापुरात समारोप- सायंकाळी सातच्या सुमारास पार्क मैदानावर आयोजित सभेस शहा करणार मार्गदर्शन

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात दाखल झाले आहेत़ सायंकाळी सात वाजता इंदिरा गांधी स्टेडियमवर अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे.

अमित शहा याच्या स्वागतासाठी राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह अन्य राज्यातील महत्वाचे मंत्री व भाजपाचे राज्यातील व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होेते़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज सोलापुरात समारोप होणार आहे.

 या समारोप कार्यक्रमात उस्मानाबाद येथील राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्याचे वडील पद्मसिंह पाटील व कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे़ अमित शहा हे सध्या शासकीय विश्रामगृह येथे दाखल झाले असून सायंकाळी सहाच्या सुमारास महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी जुना पुणे नाका येथे जाणार आहे़ जुना पुणे नाका ते पार्क चौक दरम्यान अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होणार आहे.

अमित शहा याच्या सभेसाठी शहर व जिल्ह्यातील विविध भागातून भाजपाचे कार्यकर्ते पार्क मैदानावर दाखल होत आहेत़ शहर पोलीसांनी पार्क चौक परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. 


Web Title: Union Home Minister Amit Shah arrives in Solapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.