शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या कायद्यांतर्गत दाम्पत्यांना अटक केली?

By admin | Updated: September 23, 2015 01:36 IST

कायद्याच्या कोणत्या तरतुदींतर्गत मालवणी येथील हॉटेल्सवर धाड घालून दाम्पत्यांना अटक करण्यात आली

मुंबई: कायद्याच्या कोणत्या तरतुदींतर्गत मालवणी येथील हॉटेल्सवर धाड घालून दाम्पत्यांना अटक करण्यात आली, असा सवाल राज्य सरकारला करत उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत यासंदर्भात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.६ आॅगस्ट रोजी पोलिसांनी मालवणी येथील मढमधील हॉटेल्सवर धाड घालून ६१ लोकांना बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट कलम ११० (अश्लील वर्तन) अटक केली, त्यात १३ दाम्पत्यांचा समावेश होता. पोलिसांनी घातलेली धाड बेकायदेशीर होती आणि नागरिकांच्या खासगी आयुष्यावर गदा आणणारी होती, असे म्हणत खारचे रहिवासी सुमीर सब्रवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि नाहक पकडण्यात आलेल्या दाम्पत्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.‘राज्य सरकारने ही कारवाई कायद्याच्या कोणत्या तरतुदींतर्गत केली, याची आम्ही यापूर्वीही विचारणा केली आहे. त्यावेळी सरकारने स्थानिकांनी केलेल्या तक्रारीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे आम्हाला सांगितले. मात्र तरीही कोणत्या तरतुदीअंतर्गत तुम्ही ही कारवाई केली, ते स्पष्ट करा,’ असे म्हणत खंडपीठाने राज्य सरकारला यासंदर्भातील स्पष्टीकरण देण्यासाठी दोन आठवड्यांत अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. धाड घालण्यामागे पोलिसांचा हेतू चांगला असला, तरी नागरिकांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण केले जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने राज्य सरकारला सुनावले होते. (प्रतिनिधी)