शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उंब्रज येथील विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात; इर्मजन्सी व्हिसासाठी कुणी मदत करेल काय?; अत्यवस्थ लेकीसाठी पालकांचा टाहो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:38 IST

रूममेट खुशी ठरली संदेशदूत

सातारा : शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत असणाऱ्या उंब्रज येथील विद्यार्थिनी नीलम शिंदे हिचा अपघात झाला. अत्यवस्थ अवस्थेत अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या नीलमच्या रक्तातील नातेवाइकांनी तिच्याकडे यावे, असे पत्र रुग्णालय आणि विद्यापीठाने तिच्या नातेवाइकांना दिले; पण इर्मजन्सी व्हिसा न मिळाल्याने तिच्यापर्यंत पोहोचणे कुटुंबीयांना अशक्य झाले आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणीपर्यंत तिच्या कुटुंबीयांना पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज गावातील नीलमचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेत अपघात झाला. व्यायामासाठी चालत असताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून तिला जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कारचालकाला पोलिसांनी पकडले आहे. या अपघातात नीलमच्या डोक्याला आणि दोन्ही हातापायांना दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेत एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मरणाच्या दारात असणाऱ्या लेकीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना व्हिसा मिळत नाही.

रूममेट खुशी ठरली संदेशदूतअमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे शिक्षणासाठी गेलेल्या नीलम शिंदे हिचा अपघात १४ फेब्रुवारीला झाला. याविषयीची माहिती कुटुंबीयांना १६ फेब्रुवारीला मिळाली. अपघातग्रस्त वडील आणि मामाचा मुलगा हे दोघेही अमेरिकेला जाण्यासाठी सज्ज झाले; पण व्हिसा मिळत नसल्याने सर्वच अडचणीचे झाले. अशा परिस्थितीत रोजच्या रोज नीलमच्या प्रकृतीबाबत तिची रूममेट खुशी माहिती देऊ लागली. कुटुंबीय आता तिच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांच्याही संपर्कात आहेत.

ही आहे अडचणअमेरिकेत जाण्यासाठी बरेच कडक नियम आहेत. नीलमच्या नातेवाइकांनी सर्व नियमांची पूर्तता केली असली तरीही त्यांना व्हिसासाठी हिरवा कंदील मिळाला नाही. सामान्य पद्धतीने व्हिसासाठी अर्ज केल्यास २०२६ मध्ये नंबर येतोय. जादा पैसे भरून व्हिसा मिळवायचा म्हटला तरी एजंट एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगत आहेत. दिवसागणिक नीलमची प्रकृतीत चढ-उतार होत असल्याने कुटुंबीय अस्वस्थ होत आहेत.

आमच्या क्षमतेनुसार प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळाले नाही. राज्यातील राजकीय नेते, दूतावास अधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला नीलमपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. - संजय कदम, नीलमचा मामा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAmericaअमेरिकाVisaव्हिसाAccidentअपघातStudentविद्यार्थी