उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गुलदस्त्यात

By Admin | Updated: June 19, 2014 20:09 IST2014-06-19T20:09:02+5:302014-06-19T20:09:02+5:30

सध्या निवडणूक लढवायचा विचार केलेला नसून महायुतीतील मुख्यमंत्रीपदाचा निर्णयही महायुतीतील अन्य पक्षांशी चर्चा करुनच घेऊ असे स्पष्टीकरण शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिले आहे.

Uddhav Thackeray's Chief Minister Gulistan | उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गुलदस्त्यात

उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गुलदस्त्यात

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १९- सध्या निवडणूक लढवायचा विचार केलेला नसून महायुतीतील मुख्यमंत्रीपदाचा निर्णयही महायुतीतील अन्य पक्षांशी चर्चा करुनच घेऊ असे स्पष्टीकरण शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार का आणि मुख्यमंत्री होतील का हे अजूनही गुलदस्त्यातच राहिले आहे. 
शिवसेनेचा गुरुवारी ४८ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. या सोहळ्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, शिवसेना मुख्यमंत्रीपद वाटून घेणार नाही असे विधान शिवसेना नेत्यांनी केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष होते. सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. मी तूर्तास निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला नाही असे उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितले. गोपीनाथ मुंडेच्या अकाली निधनामुळे महायुतीतील पक्षांची बैठक होऊ शकली नाही. या धक्क्यातून सावरुन आता महायुतीतील पक्षांची पुन्हा एकदा बैठक होईल.  महायुतीतील अन्य पक्षांशीच चर्चा करुनच मुख्यमंत्रीपदाविषयी चर्चा करु असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. 
लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुतीने आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी केली जात होती. याविषयी उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला आधी निवडणूक जिंकणे महत्त्वाचे आहे. लोकांसमोर जाताना काही ठोस आश्वासन देण्याची गरज असते. आश्वासन देण्यापूर्वी ती पूर्ण करणे शक्य आहे की नाही याची चाचपणी सुरु आहे. 
 

Web Title: Uddhav Thackeray's Chief Minister Gulistan