फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा आणखी एक धक्का; त्या साखर कारखान्यांची बँक हमी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 10:24 PM2019-12-04T22:24:05+5:302019-12-04T22:25:34+5:30

महाराष्ट्रावर 6.7 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. यामुळे राज्याचा गाडा हाकताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Uddhav Thackeray's another blow to devendra Fadnavis; canceled the guarantee of Bank for sugar factories | फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा आणखी एक धक्का; त्या साखर कारखान्यांची बँक हमी रद्द

फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा आणखी एक धक्का; त्या साखर कारखान्यांची बँक हमी रद्द

Next

मुंबई : राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्या साखर कारख्यानांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली 310 कोटी रुपयांची बँक हमी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने रद्द केली आहे. 


महाराष्ट्रावर 6.7 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. यामुळे राज्याचा गाडा हाकताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारने या चार नेत्यांशी संबंधीत साखर कारखान्यांना 310 कोटी रुपयांची बँक हमी दिली होती. राज्याच्या आर्थिक परिस्थितीच्या आढावा बैठकीत ठाकरे यांनी ही हमी रद्द केली आहे. 


राजकीय हेतूने या कारखान्यांना बँक हमी दिल्याचं आढळल्यास बँक हमी रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेन आणि फडणवीस यांचा समृद्धी महामाकर्गाच्या कामावर बंदी आणण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने कोणतेही प्रकल्प रद्द केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच ज्या प्रकल्पांची खरेच गरज आहे अशा प्रकल्पांचेच काम सुरू ठेवणार असल्य़ाचे म्हटले होते. 


या चार नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालीन सरकारने बँक हमी आणि खेळत्या भांडवलापोटी मदत दिली होती. पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना, विनय कोरे यांचा श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आणि कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना यांना ही हमी देण्यात आली होती. यापैकी काळे हे भाजपात जाण्याच्या प्रयत्नात होते. 

Web Title: Uddhav Thackeray's another blow to devendra Fadnavis; canceled the guarantee of Bank for sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.